30 July 2024

आई समजून घेताना

 काही दिवसांपूर्वी दैनिक सकाळ मध्ये सप्तरंग म्हणून पुरवणी येत असे.सदर पुरवणी मध्ये फिरस्ती हे एक सदर होतं बाकीचे छान छान गोष्टी त्याच्यामध्ये येत होत्या त्या रियल गोष्टींची इतकी आवड निर्माण झाली की त्याच्या लेखकाचे आणखीन काही पुस्तक आहेत का वाचायची इच्छा निर्माण झाली त्यातच मला समजले, त्याची लेखक उत्तम कांबळे यांची आई समजून घेताना हे पुस्तक आहे नंतर पाहिलं तर कळल या पुस्तकाची खूप ऐकायला मिळालं तेव्हाच ठरवलं होतं की हे पुस्तक मिळालं की वाचायचं खूप दिवसांनी तो योग आला आणि नेमके ते पुस्तक हातात पडलं खरंच उत्तम कांबळे चे पुस्तक वाचून खूप बरं वाटलं आईला भेटले याचा समाधान लाभले.

आई समजून घेताना 

पोटातील भूक शमवण्यासाठी आवकाने जणू एक फॉर्म्युलाच तयार केला होता, माझ्यात शब्दांत पाणी फॉर्म्युला भूक जास्त लागली असेल आणि खाण्यासाठी अन कमी मिळत असेल तर जेवणापूर्वी भरपूर पाणी प्यावं... जेवता जेवताही प्यावं आणि जेवणानंतरही प्यावं... सबब अन्नाऐवजी पाण्यानेच पोट भरतं... कमी अन्नात भागतं, उपासमारीच्या काळात आणि विशेषतः डायबेटीस पचवण्याच्या काळात मला हा फॉर्म्युला खूप उपयोगी पडला. डायबेटीसवाल्याला खूप कडाडून भूक लागते. भरपूर खावंसं वाटतं अशा वेळी पाण्याचा मारा करून भुकेची धग संपवता येते. काही काळासाठी तरी शांत होते. आक्कानं स्वतः हा फॉर्म्युला आयुष्यभर वापरला. जेव्हा खाण्याचे दिवस आले तेव्हा तिच्या रोगाचेही दिवस आले हातात हात घालून... शस्त्रक्रिया न करता हाइड्रोथेरपीचा वापर करून आणि तिला ... पण आम्ही तिला प्रोत्साहन द्यायचो... बायको

भरपूर पाणी प्यायला सांगून मुतखडा बाहेर पडतो का याचा प्रयोग सुरू झाला... खूपखूप पाणी पिताना ती कंटाळायची... एकसारखं पाणी पिऊन आतडी सुजतील असं म्हणायची

प्रोत्साहन द्यायची... नातवंडं प्रोत्साहन द्यायची... आक्का पी पाणी... आत्या पाणी प्या... आजी पी पाणी... भरपूर पी... आणखी पी... पाणी फॉर्म्युला म्हातारपणी आपल्यावर उलटेल असं तिला कधी वाटलं नसावं.. 

@ उत्तम कांबळे

No comments:

Post a Comment

विशाखा

म ध्यंतरी मराठी पाठ्यपुस्तकातील कवितेवरून समाज माध्यमांवर मोठा वादंग सुरू होता. त्यात एक बाब ठळकपणे अधोरेखित झाली, ती म्हणजे आजच्या तरुण पिढ...