Showing posts with label कविता. Show all posts
Showing posts with label कविता. Show all posts

28 July 2024

परवड

 || परवड  ||

सप्त पदी चालता चालता,

स्वप्न मनात किती रंगविली,

सुखाचा संसार थाटण्या सख्या,

तुझ्या मागोमाग चालली...

गोंडस बाळे,सुंदर घरकुल,

मनात साठवून ठेवली,

जगंनियंत्याला स्मरून,

तूझ्या मागोमाग चालली...

थोडे दिवस संसार सुखाचा?

चालला होता रडत कढत,

सुचेना घर,"अग"ची याद,

चालली मागे फरफटत...

उद्ध्वस्त स्वप्न,नाही बाळे,

सुरूच राहिले तुझे चाळे,

छातीवर दगड ठेवून,

तूझ्या मागे पळ पळ पळे...

बाटली पाहून पारदर्शक,

नितळ मनाची आतली,

माझ्या पेक्षा तिने तुला,

बग रे मोहिनी घातली.

नको घाव घालू सख्या,

थांबवं रे माझी परवड,

अहेवाचे लेणं लावून,

थांबव माझी वणवण...


श्री. निवृत्ती कोरडे,

८८८८८५१६६६

बोरी बुद्रुक,

शिवभूमि:-जुन्नर,

पुणे / मुंबई

01 December 2021

पक्ष बदलणारा सामान्य कार्यकर्ता

 पक्ष बदलणारा सामान्य कार्यकर्ता

आठवले साहेबांचा काम करायच्या हेतूने

शाखा अध्यक्ष झालेला नवीन पोरगा ज्याचं टमटम

फायन्सन हप्त्यांने घेतलेले होते..

पुढे तो...पद मिळतेय म्हणून

निकाळजे गटात जातो...

त्यातही कोणी विचारत नाही.

जो तो आपली पोळी भाजायला बसलेला आहे असं वाटतंय म्हणून

बाबासाहेबांच्या जवळची चळवळ आणि 

त्यांच्या विचारांची हाक म्हणून बाळासाहेबाच्या पक्षात पद घेऊन कामाला लागला....

त्याला तिथंही विचारेनात म्हणून...

तो आता पुन्हा आठवले साहेबांच्या पक्षात येतोय....

पक्ष कार्यकर्ता म्हणून...

या सगळ्या प्रवासात...

 ते वर्षाच्या कालखंडात....

हप्त्यांने घेतलेले टमटम जून झालं आहे..

दरवाजा ला सड लागली आहे

इंजिन धुकधुक करत धूर मारायला लागला आहे

खडाखड आवाज येत आहे....

त्याला धक्का मारून चालू करावं लागत आहे

मुलगा टमटमचा मालक आहे

कर्तृत्ववान आहे म्हणून...

त्याचे लग्न झालेले

त्याला एक मुलगी.... एक मुलगा अशी...लहान मुलं आहेत...

पक्ष बदलले पण त्याची आर्थिक परिस्थिती नाही

बदलली उलट अजून वाईट झालीय....

या वर्षाच्या काळात फक्त कार्यकर्ता म्हणूनच त्याचा वापर झालाय हे त्याला समजले नाहीय...

उलट तो म्हणतोय ...

बाबासाहेबांच्या विचाराशी एकनिष्ठ राहून

समाजात काहीतरी काम करायची संधी मिळाली तर

माझ्यासाठी मी भाग्य समजतो..

आता याला कुणी सांगायचं ...

तू कार्यकर्ता म्हणून सगळ्यांनी वापर करून घेत फक्त तुझी मारली आहे...

राजकारण

पक्ष अध्यक्ष

पक्षाचा सदस्य

कार्यकर्ता

कार्यक्रमातला फेटा

एखादा स्टेजवरचा सत्कार

वाढदिवसाचा केक म्हणजे चळवळ नाही....

स्वता भिकारी होणे म्हणजे चळवळ नाही....

हे त्याला..आता... कसं समजावू...

आंबेडकरी चळवळ भिकेला लागायला हे गट तट आणि त्यांच्यातला स्वार्थ तर कारणीभूत आहेच पण अगदी बुद्धी घाण ठेवून भावनिक असलेला प्रत्येकजण आहे जो स्वताला बाबासाहेबांचा अनुयायी समजतो... 

विशाखा

म ध्यंतरी मराठी पाठ्यपुस्तकातील कवितेवरून समाज माध्यमांवर मोठा वादंग सुरू होता. त्यात एक बाब ठळकपणे अधोरेखित झाली, ती म्हणजे आजच्या तरुण पिढ...