07 December 2021

इगो इज द् एनिमी

इगो इज द् एनिमी
अहंम् अर्थात इगो!

इगो लेव्हल सोडून मोठा होतो तेंव्हा अशा माणसाला दुसऱ्या शत्रुची गरज पडत नाही.स्वतःचा "इगो" च त्याच्या प्रगतीला खीळ घालतो.
थोडा विचार केला तर आपल्या लक्ष्यात येईल नात्यांमधील दुरावा, मैत्रीत निर्माण होणारी तेढ,नोकरी व्यवसायात थांबलेली प्रगती, वैर आणि शत्रुत्व याला कोणत्या ना कोणत्या प्रकारे इगो कारणीभूत असतो.
रावणाची शक्ती ,भक्ती,बुध्दी प्रचंड असूनही त्याचा लय झाला तो केवळ त्याच्या इगो मुळे!
द्रौपदी मुळे कर्ण आणि दुर्योधनाचा इगो दुखावला गेला होता...पुढे महाभारत घडले.

पण या इगो ला जर आपण सुपर इगो बनवले तर? मग त्यातून जे तयार होते ,ते अतिशय भव्य असते.ते कसे या पुस्तकातून समजते.काय आहे हे पुस्तक?
ऑबस्ट्रकल इज द् वे', ह्या पुस्तकात रायन हॉलिडे जीवन प्रवासातील बाह्य अडथळ्यांचा, तर आपल्या नव्या कोऱ्या पुस्तकात म्हणजेच, 'इगो इज द् एनिमी' मध्ये रायन आंतरिक अडथळ्यांचा वेध घेत, आपल्या तळहातावर व्यावहारिक आणि प्रेरणादायक तत्वज्ञान ठेवतो. या ग्रंथाच्या निमित्ताने इतिहासाच्या उदरात, शतकानुशतके मागे जाऊन नानाविध शक्तिशाली संकल्पनांचा अभ्यासपूर्ण शोध रायन यांनी घेतला आहे. तो वाचण्यासारखा आहे.
  'अहंकार हा आपला सर्वात मोठा शत्रू असल्याचे प्रतिपादन रायन यांनी आपल्या 'इगो इज द् एनिमी' या नव्या पुस्तकात केले आहे. रायन म्हणतो: 'तुम्हा-आम्हा सर्वांच्या कारकीर्दीच्या प्रारंभी, कौशल्ये शिकताना वा विकसित करताना, आपल्याला आपला अहंकारच प्रतिबंधित करीत असतो. जेव्हा आपण यशाची चव घेतो, तेव्हा अहंकार आपल्या स्वतःच्या चुकांकडे डोळेझाक करायला लागतो. अहंकार आपल्याला इतरांपासून सहजपणे दूर करीत एकटे पाडतो. यातून आपण अधःपतीत होऊ लागतो. एकूणच, अहंकार विनाशकारी असल्याचे रायन आपल्या निदर्शनास आणून देतो. म्हणूनच 'मी'पणाला अहंकाराला आपण वेळीच ओळखायला हवे! तसे झाले तरच, आपण आपले कार्य पूर्ण क्षमतेने करू शकू!

  आपल्या इच्छा-आकांक्षांच्या मागे धावताना वर्तमानाचे भान आपण सोडता कामा नये! मुख्य म्हणजे, आपण नम्र राहिले पाहिजे. मोठे यशवैभव प्राप्त झाल्यानंतरदेखील आपले पाय जमिनीवर घट्ट रोवलेले हवेत! यशापेक्षा अपयशातून आपल्याला खूप काही शिकता येते. त्यासाठी आपण लवचिक आणि ग्रहणशील राहिले पाहिजे. अहंकाराला हद्दपार करीत, नम्रता आणि आत्मविश्वास या दोन गोष्टी जर तुमच्याकडे असतील, तर तुम्ही वास्तवाचा सहजपणे सन्मान करू शकाल! हा रायन हॉलिडेचा सांगावा आहे.
पुस्तक:इगो इज द् एनिमी'
लेखक:रायन हॉलिडे
मराठी अनुवाद: डॉ कमलेश सोमण आणि जीवन आनंदगावकर
प्रकाशन: गोयल प्रकाशन
पृष्ठ:२७२
मूल्य:२५०/ टपाल:३०/ एकूण:२८०/
खरेदीसाठी व्हॉट्सॲप करून नाव, पत्ता, पिनकोड आणि मोबाईल नंबर
 9421605019

06 December 2021

अन्न

 

शरद ऋतूतील एक उज्ज्वल दिवस, मुंग्यांचे एक कुटुंब उबदार सूर्यप्रकाशात कामात व्यस्त होते. उन्हाळ्यात त्यांनी साठवून ठेवलेले धान्य ते कोरडे करत असताना एक उपाशी टोळ आले.

 हात मध्ये  सारंगी घेऊन टोळ आला , टोळ नम्रपणे खाण्यासाठी काहीतरी खाऊ  मागू लागला. त्याचे बोलणे ऐकताच 

" मुंग्या ओरडल्या, “तुम्ही हिवाळ्यासाठी अन्न साठवले नाही का ?  उन्हाळ्यात तू झोपला  होतस कि काय  ?”

टोळ म्हणाला ." हिवाळ्यापूर्वी अन्न साठवण्यासाठी माझ्याकडे वेळ नव्हता,"  "मी संगीत करण्यात खूप व्यस्त होतो की उन्हाळा उडून गेला."

मुंग्या फक्त खांदे सरकवत म्हणाल्या, “संगीत बनवत आहात ना ? खूप छान, आता नाच !” मग मुंग्यांनी टोळाकडे पाठ फिरवली आणि कामावर गेल्या ...

https://cdn.shopify.com/s/files/1/0292/2958/0367/products/images_26_4db4d0c3-43f3-44cd-8fa8-5965c6b720cb_442x694.jpg?v=1605990391


05 December 2021

गुलाब

 एके काळी,  वाळवंटात, एक गुलाबाचे झाड होते त्याला खूप  सुंदर गुलाबाची लागलेली असत व ती  दिसला  खूप  सुंदर होती त्या झाडाला आणि त्याच्या फुलांना त्यांच्या सुंदर त्यात  खूप अभिमान वाटत होता.

 त्या झाडाची  एकच तक्रार होती  त्याच्या समोरच एक कुरुप निवडुंगाचे झाड वाढत होते.  गुलाबाचे झाड रोज  निवडुंगाचा अपमान करायचे  आणि त्याच्या दिसण्यावरून त्याची थट्टा करायचा, तर निवडुंग शांत बसून असल्याचं तो गुलाबाच्या झाडाला प्रतिउत्तर देत नसे . आजूबाजूच्या इतर सर्व वनस्पतींनी गुलाबाला समजवण्याचा प्रयत्न केला . परंतु ते झाड व त्याची फुले  स्वत: च्या दिसण्याने खूप गर्विष्ठ  झाली होती .

एक  काय झाले  वाळवंटात कडक  उन्हाळा पडला , वाळवंट कोरडे झाले आणि झाडांना पाणी उरले नाही. गुलाब पटकन कोमेजायला लागला. तिच्या सुंदर पाकळ्या सुकल्या, त्यांचा हिरवा रंग निस्तेज झाला 

त्यावेळी त्याची नजर निवडुंगाकडे गेले निवडुंगाकडे पाहत असताना गुलाबाच्या लक्षात आले  एक चिमणी पाणी पिण्यासाठी आपली चोच निवडुंगाच्या पानात  बुडवताना दिसली. 

शरमेने चूर झालेल्या    गुलाबाने निवडुंगाला  विचारले की तिला थोडे पाणी मिळेल का ? दयाळू निवडुंगाने  सहज सहमती दर्शवली आणि कठीण उन्हाळ्यात त्यांना मित्र म्हणून मदत केली.


इगो इज द् एनिमी

इगो इज द् एनिमी
अहंम् अर्थात इगो!

इगो लेव्हल सोडून मोठा होतो तेंव्हा अशा माणसाला दुसऱ्या शत्रुची गरज पडत नाही.स्वतःचा "इगो" च त्याच्या प्रगतीला खीळ घालतो.
थोडा विचार केला तर आपल्या लक्ष्यात येईल नात्यांमधील दुरावा, मैत्रीत निर्माण होणारी तेढ,नोकरी व्यवसायात थांबलेली प्रगती, वैर आणि शत्रुत्व याला कोणत्या ना कोणत्या प्रकारे इगो कारणीभूत असतो.
रावणाची शक्ती ,भक्ती,बुध्दी प्रचंड असूनही त्याचा लय झाला तो केवळ त्याच्या इगो मुळे!
द्रौपदी मुळे कर्ण आणि दुर्योधनाचा इगो दुखावला गेला होता...पुढे महाभारत घडले.

पण या इगो ला जर आपण सुपर इगो बनवले तर? मग त्यातून जे तयार होते ,ते अतिशय भव्य असते.ते कसे या पुस्तकातून समजते.काय आहे हे पुस्तक?
    ऑबस्ट्रकल इज द् वे', ह्या पुस्तकात रायन हॉलिडे जीवन प्रवासातील बाह्य अडथळ्यांचा, तर आपल्या नव्या कोऱ्या पुस्तकात म्हणजेच, 'इगो इज द् एनिमी' मध्ये रायन आंतरिक अडथळ्यांचा वेध घेत, आपल्या तळहातावर व्यावहारिक आणि प्रेरणादायक तत्वज्ञान ठेवतो. या ग्रंथाच्या निमित्ताने इतिहासाच्या उदरात, शतकानुशतके मागे जाऊन नानाविध शक्तिशाली संकल्पनांचा अभ्यासपूर्ण शोध रायन यांनी घेतला आहे. तो वाचण्यासारखा आहे.
      अहंकार हा आपला सर्वात मोठा शत्रू असल्याचे प्रतिपादन रायन यांनी आपल्या 'इगो इज द् एनिमी' या नव्या पुस्तकात केले आहे. रायन म्हणतो: 'तुम्हा-आम्हा सर्वांच्या कारकीर्दीच्या प्रारंभी, कौशल्ये शिकताना वा विकसित करताना, आपल्याला आपला अहंकारच प्रतिबंधित करीत असतो. जेव्हा आपण यशाची चव घेतो, तेव्हा अहंकार आपल्या स्वतःच्या चुकांकडे डोळेझाक करायला लागतो. अहंकार आपल्याला इतरांपासून सहजपणे दूर करीत एकटे पाडतो. यातून आपण अधःपतीत होऊ लागतो. एकूणच, अहंकार विनाशकारी असल्याचे रायन आपल्या निदर्शनास आणून देतो. म्हणूनच 'मी'पणाला अहंकाराला आपण वेळीच ओळखायला हवे! तसे झाले तरच, आपण आपले कार्य पूर्ण क्षमतेने करू शकू!
      आपल्या इच्छा-आकांक्षांच्या मागे धावताना वर्तमानाचे भान आपण सोडता कामा नये! मुख्य म्हणजे, आपण नम्र राहिले पाहिजे. मोठे यशवैभव प्राप्त झाल्यानंतरदेखील आपले पाय जमिनीवर घट्ट रोवलेले हवेत! यशापेक्षा अपयशातून आपल्याला खूप काही शिकता येते. त्यासाठी आपण लवचिक आणि ग्रहणशील राहिले पाहिजे. अहंकाराला हद्दपार करीत, नम्रता आणि आत्मविश्वास या दोन गोष्टी जर तुमच्याकडे असतील, तर तुम्ही वास्तवाचा सहजपणे सन्मान करू शकाल! हा रायन हॉलिडेचा सांगावा आहे.

पुस्तक:इगो इज द् एनिमी'
लेखक:रायन हॉलिडे
मराठी अनुवाद: डॉ कमलेश सोमण आणि जीवन आनंदगावकर
प्रकाशन: गोयल प्रकाशन
पृष्ठ:२७२
मूल्य:२५०/ टपाल:३०/ एकूण:२८०/
खरेदीसाठी व्हॉट्सॲप करून नाव, पत्ता, पिनकोड आणि मोबाईल नंबर
 9421605019

02 December 2021

मन वढाय वढाय, उभ्या पीकातलं ढोर

 कोना कोणाला शाळेत हि कविता शिकवत असताना झालेल्या गमती आटवतात 


मन वढाय वढाय, उभ्या पीकातलं ढोर । किती हाकला हाकला, फिरी येतं पिकांवर ।।
मन मोकाट मोकाट, त्याले ठायी ठायी वाटा । जशा वार्‍यानं चालल्या, पानावर्हल्यारे लाटा ।।
मन लहरी लहरी, त्याले हाती धरे कोन? । उंडारलं उंडारलं जसं वारा वाहादन ।।
मन जह्यरी जह्यरी, याचं न्यारं रे तंतर आरे । इचू साप बरा, त्याले उतारे मंतर ।।
मन पाखरू पाखरू, त्याची काय सांगू मात?। आता व्हतं भुईवर, गेलं गेलं आभायात ।।
मन चप्पय चप्पय, त्याले नही जरा धीर । तठे व्हयीसनी ईज, आलं आलं धर्तीवर ।।
मन एवढं एवढं, जसा खाकसचा दाना । मन केवढं केवढं? आभायात बी मायेना ॥
देवा, कसं देलं मन आसं नही दुनियात । आसा कसा रे तू योगी काय तुझी करामत ॥
देवा, आसं कसं मन? आसं कसं रे घडलं । कुठे जागेपनी तूले असं सपनं पडलं ॥

कवयित्री – बहिणाबाई चौधरी




मेरा बाबा देशचालता ....

 मेरा बाबा देशचालता ....

                           मेरा बाबा देशचालता ....

 आज सकाळी पावणे नऊच्या दरम्यान माझ्या ऑफिस च्या ग्रुप वरती एक रतन टाटांनी शेअर केलेल्या व्हिडिओ आला व्हिडिओ पाहिला आणि क्षणभर स्तब्ध झालो आणि कोर्ट सिनेमाची आठवण झाली.

 आठवणींचे झरे वाहू लागले आणि काही वर्ष पूर्वीचा एक क्षण आठवला माझा सिनेमा  पाहणे एक छंदच आहे आणि कोणासोबत बघायचा  हा एक महत्वाचा भाग हे माझं वैयक्तिक  मत आहे. मी सिनेमा माझ्या दोन मित्रांसोबत पहातो गणेश शेटे आणि श्रीकांत चावडीमनी  नेहमी आम्ही सिनेमे एकत्रच  पाहतो पण कुण्या एकट्याने पाहिलेला सिनेमा जर आवडला तर परत सर्वांनी एकत्र मिळून  पहाणे हा नियम ठरलेलाhttps://youtu.be/pcNHMopzZas

  काही वर्षां पूर्वी कोर्ट हा सिनेमा पाहून झाल्यानंतर आम्ही तिघांनी एकत्र फारशी काही चर्चा केली नाही. 

चर्चा केली नाही म्हणजे फक्त आम्ही एकामेकांकडे पाहत होतो कदाचित याच्या विषयी काय बोलावं ते सुचत नव्हतं किंबहुना याविषयी खूप काहीतरी बोलले गेले पाहिजे असं वाटत असलं तरी आम्ही एकमेकांना फक्त पाहतच राहिलो होतो विषय तसा गंभीर होता . खरं बघायला गेलं तर त्या सिनेमाने डोळ्यासमोर समाजा मधला एक दुर्लक्षिलेला असा वर्ग आणला होता की जो समाजासाठी एका युद्धाचे काम करीत आला आहे  आणि करतो आहे.

 ह्या विषयावर आमच्या मध्ये झालेंनी सर्व चर्चा मी सांगत नाही  पण आमच्या चर्चा मध्ये बरेच मोठे नेते, समाजसुधारक येऊन गेले त्यामध्ये प्रामुख्याने विनोबा भावे यांनी तुरुंगात असताना त्यांनी घेतलेली सफाई  कामाची घेतलेली भूमिका आणि तिचे महत्व
                                  लक्षत आले.
त्यानंतर बराच वेळ मी माझ्या कितीतरी मित्रांशी , सहकार्‍यांशी चर्चा केली की तुम्ही कोर्ट  हा सिनेमा पाहिला आहे का तर बऱ्याच जणांच्या बोलण्यात आले की नाही आणि त्यातील बऱ्याच जणांना अजून माहीत नाही की कोर्ट  सिनेमाने कोणाचा होता त्याचा विषय काय होता.

तर मित्रानो  रतन टाटा यांनी शेयर केलेले हो विडिओ  पाहिल्यानंतर कोर्ट सिनेमा नक्की पहा….

        कोर्ट हा २०१४ चा भारतीय बहुभाषिक कायदेशीर नाटक चित्रपट आहे, जो चैतन्य ताम्हाणे यांनी दिग्दर्शित केलेला आहे. हा चित्रपट नारायण कांबळे ( विरा साथिदार ) या वृद्ध विरोधक गायकाच्या मुंबई सत्र न्यायालयात खटल्याद्वारे भारतीय कायदेशीर व्यवस्थेचे परीक्षण करतो, ज्यावर त्याच्या एका लोकगीताद्वारे गटार सफाई कर्मचाऱ्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप आहे.

चित्रपटाचे संगीत संभाजी भगत यांनी दिले होते तर मृणाल देसाई आणि रिखव देसाई यांनी अनुक्रमे छायालेखक आणि संपादक म्हणून काम केले होते. वास्तविक कोर्टरूम आणि चित्रपटांमध्ये त्यांचे चित्रण कसे केले जाते यातील फरक पाहण्यासाठी ताम्हाणे उत्सुक होते. चित्रपटात मराठी, हिंदी, गुजराती आणि इंग्रजी अशा चार भाषा बोलल्या जातात. बहुतेक संवाद मराठीत आहेत कारण ते महाराष्ट्रात सेट आहे. कायदे इंग्रजीत वाचले जातात. बचाव पक्षाचे वकील हे गुजराती असून ते गुजराती भाषा बोलतात.

२०१४  मध्ये ७१  व्या व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात कोर्टचा प्रीमियर झाला, जिथे त्याने होरायझन्स श्रेणीतील सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि ताम्हाणेसाठी लुइगी डी लॉरेंटिस पुरस्कार जिंकला. या चित्रपटाने अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये १८ इतर पुरस्कार जिंकले. २०१४ च्या मुंबई चित्रपट महोत्सवाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागात त्याचा प्रीमियर भारतात झाला आणि १७ एप्रिल २०१५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. रिलीज झाल्यावर, चित्रपटाला समीक्षकांची प्रशंसा मिळाली आणि ६२ व्या राष्ट्रीय चित्रपटात सर्वोत्कृष्ट वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकला. पुरस्कार.

 

ययाती

 ययाती

महाराष्ट्र साहित्यात सर्वोत्कृष्ट १० किंवा ५ कादंबऱ्यांची नावे घेतली तर त्यात ययातीचे नाव अग्रक्रमाने येईल. तशी ही कादंबरी आहेच.              

कादंबरी    मेहता  पब्लिशिंग हाऊस यांनी प्रकाशित केली आहे आणि मुखपृष्ठ देखील त्यांच्या तर्फेच रेखाटण्यात आले आहे. मुखपृष्ठ पांढऱ्या आश्वाच्या चित्राने रंगवले आहे. पुस्तक वाचून झालं की मग तुम्हाला त्यामागचा अर्थ कळेल की आश्वाचं चित्र का आहे ते ?

ययाति ही खांडेकरांची सर्वोत्कृष्ट रचना. वाचून झालं की हे उमगेलच. कथा महाभारतकालीन आहे. ययाति या राजाच्या आयुष्याची कहाणी. पण फक्त ययातिच नाही तर कच , देवयानी, शर्मिष्ठा या पात्रांचीही ही गोष्ट आहे. कथा ही पौराणिक असून कथेचा जो गाभा पुराणात आहे तोच इथेही आहे पण खांडेकरांनी काही धागेदोरे स्वतंत्र रीतीने यात गुंफले आहे. फार ताकदीने लेखन केलंय त्यांनी. यातल्या मुख्य चार पात्रांना एकमेकांविषयी प्रेम वाटते पण ते पुढे असफल , क्षणिक आणि अपुरे राहते.

कामवासना हा या कादंबरीचा गाभा ! मनुष्य शरीरसुखामागे / क्षणिक सुखामागे धावतो , त्याला आपल्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान देतो आणि विनाशाकडे जात अनेकवेळा उपभोग घेऊनही अतृप्तच राहतो. हा या कादंबरीचा थोडक्यात सार . कथा जशी जशी पुढे जाते तसे तसे नवनवीन पात्र येत जातात. मुख्य चार पात्रे यात आहेत. जी शेवटपर्यंत राहतात.

यातला कच हा आधुनिक काळातल्या आदर्श पुरुषाचा नेतृत्वकर्ता. महाभारतातला खरा कच वेगळाच आणि या कादंबरीतला खांडेकरांचा कच वेगळा. फारच उत्कृष्टपणे त्यांनी तो रेखाटलाय . तो ध्येयवादी आहे. आसपास तो वासना बळावू देत नाही. तो संयमी आहे. प्रत्येक प्राणीमात्रावर तो निरपेक्ष प्रेम करतो , त्याचे देवयानी वरचे प्रेम जरी असफल झाले असले तरी तो थांबला नाही तो निर्मळ सरितेसारखा अविरत वाहतच राहिला. एकेकाळची आपली प्रेयसी आता संसारी स्त्री बनली आहे हे ध्यानात धरून ज्याप्रकारे तो देवयानी सोबत संवाद साधतो ते वर्णन तर उत्कृष्टच आहे.

देवयानी या पात्राचे तिच्या आयुष्यात ध्येय काहीच नव्हते. लाडात वाढलेली पोर ती. हे किती प्रातिनिधिक आहे बघा ! आजच्या काळातही परिस्थिती एकदम अभिन्न. श्रीमंत घरात वाढलेली बहुतांश मुले ध्येयहिनच असतात. बऱ्याचदा आंतरिक विचार त्यांच्या ठायी नसतो. इथेही तसच होतं. कुठलाही योग्य निर्णय न घेता , पुरेसा विचार न करता फक्त शर्मिष्ठेचा बदला घेण्यासाठी - तिला आपली दासी बनवण्यासाठी देवयानीने यायातिशी लग्न केलं. त्यानंतर ती ययातिला ना प्रेम देऊ शकली ना शारीरिक - मानसिक सुख ! उलट आई झाल्यावर देखील तिच्यातली अवखळ , हट्टी आणि अविचारी लहान पोर दिसून येते.

आणि कदाचित याच कारणामुळे ययाति शर्मिष्ठेवर प्रेम करू लागला. एका आदर्श पत्नीने जे पतीला द्यायचे असते ते सर्व शर्मिष्ठेने ययातिला दिले. श्रीमंत वडिलांची मुलगी असूनही स्वतःच्या एका चुकीमुळे ती आयुष्यभर दासी बनून राहते. सर्व समस्यांना तोंड देते. सुख - विलासाचा त्याग करते , हे धाडसच !

कादंबरीत भावनात्मकतेचा मजबूत स्पर्श आहे. खांडेकरांची भाषा , त्यांची कल्पनाशक्ती आणि अधून मधून येणारी जीवन आणि वासना यांच्यावर भाष्य करणारी मजबूत वाक्ये.. खूप भावतात. कादंबरीची मांडणी खरंच खूप सुरेख आहे.

कादंबरी वाचताना अनेकदा व्यक्ती भावनातीत होऊन जातो. मीही झालो होतो. अनेक प्रसंग तर असे आहेत जे वाचल्यावर एखादा मर्मभेदी बाण काळजातून चर्र भेदून जावा असा धक्का लागून डोळ्यातून अश्रू येतात. कथेतल्या अलका आणि माधवी यांच्या प्रसंगात हे होतं !

वाचताना आपण प्रत्येक पात्राशी समरस होऊन जातो त्यामुळे एक एक प्रसंग जसा येतो तसं आपल्या अंतर्मनात राग , द्वेष , मत्सर , अश्रू , दया , कणव , करुणा , आसुया या भावना युद्ध करतात. हरवून जायला होतं. खांडेकर जीवनाचं अंगभूत दर्शन घडवतात.कादंबरीतलं प्रत्येक पात्र आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतं.

काही कादंबऱ्या मादक असतात. त्या भुरळ पडतात , ययाति - मृत्युंजय या कादंबऱ्या त्याच पट्टीतल्या.

ययाती समजून घ्यावी लागते !

सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही कादंबरी प्रातिनिधिक आहे. ती प्रातिनिधिक आहे आजच्या काळाशी - आजच्या समाजाशी. यातली सर्व प्रमुख पात्रे आजच्या पिढीतल्या मनुष्याचे प्रतिनिधी आहेत.

     ही कथा तर वाचाच पण पुस्तकात कदाचित मुद्दाम दिलेली पार्श्वभूमी वाचाच वाचा. कादंबरी कशी जन्माला आली फक्त हेच नाही तर आजचा समाज , यातले व्यक्ती , भरकटलेली मानसिकता , पिसाळलेली कामवासना या सर्वांवर खांडेकरांनी अगदी आग ओकल्याप्रमाणे परखड भाष्य केलंय. चुकीच्या मार्गाने चालत असलेल्या समाजाबाबत त्यांनी हळहळ व्यक्त केली आहे तर कामवासना ही एका विशिष्ट मर्यादेत असायला हवी असेही ते म्हणतात. जर तुम्ही ही पार्श्वभूमी वाचली नाही तर पुस्तक अर्धवट वाचल्यासारखं होईल.

कादंबरी वाचल्यावर तुम्हाला अनेक गोष्टी कळतील , समजतील , नव्याने उमगतील. खऱ्या अर्थाने वाचकांना मोठं करणारी कादंबरी !

 

01 December 2021

पक्ष बदलणारा सामान्य कार्यकर्ता

 पक्ष बदलणारा सामान्य कार्यकर्ता

आठवले साहेबांचा काम करायच्या हेतूने

शाखा अध्यक्ष झालेला नवीन पोरगा ज्याचं टमटम

फायन्सन हप्त्यांने घेतलेले होते..

पुढे तो...पद मिळतेय म्हणून

निकाळजे गटात जातो...

त्यातही कोणी विचारत नाही.

जो तो आपली पोळी भाजायला बसलेला आहे असं वाटतंय म्हणून

बाबासाहेबांच्या जवळची चळवळ आणि 

त्यांच्या विचारांची हाक म्हणून बाळासाहेबाच्या पक्षात पद घेऊन कामाला लागला....

त्याला तिथंही विचारेनात म्हणून...

तो आता पुन्हा आठवले साहेबांच्या पक्षात येतोय....

पक्ष कार्यकर्ता म्हणून...

या सगळ्या प्रवासात...

 ते वर्षाच्या कालखंडात....

हप्त्यांने घेतलेले टमटम जून झालं आहे..

दरवाजा ला सड लागली आहे

इंजिन धुकधुक करत धूर मारायला लागला आहे

खडाखड आवाज येत आहे....

त्याला धक्का मारून चालू करावं लागत आहे

मुलगा टमटमचा मालक आहे

कर्तृत्ववान आहे म्हणून...

त्याचे लग्न झालेले

त्याला एक मुलगी.... एक मुलगा अशी...लहान मुलं आहेत...

पक्ष बदलले पण त्याची आर्थिक परिस्थिती नाही

बदलली उलट अजून वाईट झालीय....

या वर्षाच्या काळात फक्त कार्यकर्ता म्हणूनच त्याचा वापर झालाय हे त्याला समजले नाहीय...

उलट तो म्हणतोय ...

बाबासाहेबांच्या विचाराशी एकनिष्ठ राहून

समाजात काहीतरी काम करायची संधी मिळाली तर

माझ्यासाठी मी भाग्य समजतो..

आता याला कुणी सांगायचं ...

तू कार्यकर्ता म्हणून सगळ्यांनी वापर करून घेत फक्त तुझी मारली आहे...

राजकारण

पक्ष अध्यक्ष

पक्षाचा सदस्य

कार्यकर्ता

कार्यक्रमातला फेटा

एखादा स्टेजवरचा सत्कार

वाढदिवसाचा केक म्हणजे चळवळ नाही....

स्वता भिकारी होणे म्हणजे चळवळ नाही....

हे त्याला..आता... कसं समजावू...

आंबेडकरी चळवळ भिकेला लागायला हे गट तट आणि त्यांच्यातला स्वार्थ तर कारणीभूत आहेच पण अगदी बुद्धी घाण ठेवून भावनिक असलेला प्रत्येकजण आहे जो स्वताला बाबासाहेबांचा अनुयायी समजतो... 

नेताजींचा मृत्यू भारताचे सर्वात मोठे रहस्य

 

भारताचे सर्वात मोठे रहस्य

मृत्यू अटळ ! पण तो जर गूढ असेल तर..... आणि देशाचे नेतृत्व करणाऱ्यांची असेल तर त्यावर तर चर्चा होईलच ना !

    आपल्या देशातील दोन महापुरुष ज्यांचे महान नेतृत्व , अफाट कर्तुत्व होते पण त्यांचा अंत मात्र देशासाठी अतिशय क्लेशदायक ठरला. कारण ते मृत्यू गूढ होते....

ते म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस आणि लालबहादूर शास्त्री!

अनुज धर हे एक शोध पत्रकार! त्यांनी या संदर्भात अतिशय खोलात जाऊन, देशविदेशातील लोकांना भेटून, उपलब्ध कागद पत्रांचा पुरावा म्हणून वापर करून,व्यवस्थेच्या ,सरकारच्या  विरोधात जाऊन लिखाण केलं....त्यांची ही दोन पुस्तकं !

v       नेताजींचा मृत्यू भारताचे सर्वात मोठे रहस्य

अनुज धर यांनी लिहिलेले पुस्तकं विशेष सवलतीच्या दराने उपलब्ध !

पुस्तक उघडताच वाचकाला पहिला धक्का बसतो.अजून पुस्तकाची सुरुवात ही झालेली नसते ! त्याआधीच लेखक स्पष्टपणे लिहितो,नेताजींच्या मृत्युचा शोध घेण्यात सरकारने मुद्दामहून अडथळे आणले.ज्यांच्या आधारे लेखक लिहितो त्या गोपनीय कागदपत्रांचे उतारे आणि फोटो पुस्तकात वाचकांना वाचायला मिळतात हे त्यापेक्षा ही मोठे आश्चर्य आहे... कारण यातील बरीच कागदपत्र अजूनही गोपनीय आहेत  !

महानायक नेताजी! भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात ज्यांनी प्राण ओतला.निस्तेज झालेला स्वातंत्र्यलढा ज्यांनी ढण  ढना पेटवला!

तरुणांचे ताईत ! उभ्या भारताचे लाडके नेते!गांधीजींनी उभ्या केलेल्या उमेदवाराला हरवून जे काँग्रेस चे अध्यक्ष झाले होते ! काँग्रेस मधील गांधी गटाने त्यांचे नेतृत्व अकार्यक्षम व्हावे यासाठी लागतील ते प्रयत्न केले.शेवटी तर त्यांना काँग्रेस मधून बहिस्कृत करून माफी मागण्यास सांगितले.

ब्रिटिश सरकारच्या नजरेत धूळ फेकून वेषांतर करून काबूल- मास्को मार्गे बर्लिन ला जाऊन भारतासाठी प्रयत्न केले.जर्मनीत हिटलर शी बोलले. तेथून पाणबुडी ने पाण्याखालून प्रवास करून जपान ला पोहचले.

आझाद हिंद सेनेची आणि आझाद हिंद सरकारची कमान सांभाळली! चलो दिल्ली म्हणून भारतच्या स्वातंत्र्यासाठी थेट युद्धाला सुरुवात केली! अशा या लोकप्रिय नेत्याचा दुर्दैवी अंत कसा झाला हेच भारतीय जनतेला अजून माहीत नाही !

 स्वातंत्र्यापूर्वी ज्या नेत्यांना नेताजींच्या रांगेत ही बसता येऊ शकतं नव्हते असे काही सत्तेच्या केंद्रस्थानी जाऊन बसले.मग अशा सरकारने नेताजींच्या मृत्युचा शोध घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला असेल का?

हे पुस्तक लिहिणे ही एक मोठा पराक्रम आहे.कारण यातील अनेक कागदपत्र आणि नावे खूप मोठ्या व्यक्तींकडे निर्देश करतात.दहा वर्षे अभ्यास करून लिहायला सुरू केलेला हा शोध ग्रंथ इंग्रजी भाषेत तुफान लोकप्रिय ठरला.विक्रीचे अनेक रेकॉर्ड मोडले.असा हा ग्रंथ आपल्यासाठी मराठी भाषेत!

या पुस्तकातील एकेक उतारा आणि एकेक वाक्य भयंकर वास्तवाला समोर आणणारे आहे.आपले अनेक समज हे गैरसमज आहेत हे वाचकाला पुस्तक वाचताना समजायला लागते.पुस्तकाच्या पहिल्या प्रकरणात माहितीच्या अधिकारात लेखकाने मागितलेल्या कागदपत्रांचा तपशील त्यांना मिळणार नाही याची पूर्ण काळजी सरकारी अधिकाऱ्यांकडून घेतली जात होती.कमी महत्वाचे आणि बिन महत्वाची कागपत्रे उपलब्ध करून दिली जात होती.आम्ही म्हणू ती पूर्व असा स्वभाव झालेल्या बाबू लोकांना माहितीच्या अधिकाराचा त्रास होऊ लागला...सरकारला नेताजींच्या मृत्युचा शोध घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू द्यायचा नव्हता असे स्पष्ट दिसून येते.

नेताजींच्या मृत्यू सारखेच अजून एक गूढ होते आझाद हिंद सरकारच्या प्रचंड खजिन्याचे!रोख रक्कम जी जपानी येन मध्ये होती.पण त्या पेक्षा कितीतरी अधिक खजिना हा सोन्याच्या स्वरूपात होता.या खजिन्याचे पुढे काय झाले? नेताजींचे सहकारी यात सामील झाले का? जे पुढे सरकारचे ही काम करू लागले.अय्यर त्या पैकी एक! ज्यांना या खजिन्याची पूर्ण माहिती होती.त्यांनीच त्याची योजना केली होती.भारत सरकारला हवा असलेला "अर्थपूर्ण " व्यवहार  करून भारत सरकारला त्यांनी सहाय्य केलं होते.स्वाभाविक त्यांच्यावर अनेक इतर सहकाऱ्यांचा रोष होता...संशयाची सुई त्यांच्याकडे थेट येऊन थांबत होती.

भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे नेताजींच्या मृत्युचा शोध घ्यायला फारसे उत्सुक नव्हते, हे त्यांनी दिलेल्या वेगवेगळ्या वेळी उत्तरातून दिसून येते.सुरुवातीला केंद्रीय गृहमंत्री सरदार पटेल सरकार अजून कोणत्याही उत्तरासाठी असमर्थ आहेत असे सांगत.पण त्याच काळात नेहरू मात्र ,'मला यात कोणताही संशय नाही.'अशी ठाम भूमिका घेत! पंतप्रधानच स्वतः परराष्ट्रमंत्री असल्याने ही अनेक गोष्टींना न्याय मिळत नव्हता हे या पुस्तकातून कळते.१९५२ ला संसदेत नेताजींच्या मृत्यू संदर्भात प्रश्न विचारू दिलेला नव्हता!

जपान सरकारने हा विषय अत्यंत विचित्र हाताळला आहे असेही लक्ष्यात येते.प्रचंड असलेल्या संपत्तीसाठी तर जखमी नेताजींचा अंत केला गेला नाही ना? असाही प्रश्न वाचकांच्या मनात उठतो.त्याचा तपशील या पुस्तकात विविध पातळीवर आणि कागद पत्रांचा पुरावा मिळत जाताना दिसतो.

हे पुस्तक वाचून वाचकाने आपले मत बनवले पाहिजे असे वाटते.त्यामुळे यात असलेल्या अनेक गोष्टी पुस्तकाच्या परिचयात देण्याचे मी टाळत आहे.त्या पैकी एक म्हणजे " साधू भगवान जी!" जे कायम एकांतात असायचे.कोणाला भेटायचे नाही.बोलायचे नाही.आपले दर्शन द्यायचे नाही.पण जगाला मात्र ते नेताजी वाटू लागले.मग असे अनेक साधू वाटायला लागले.....हा प्रकार काय आहे?

जपान मधील रेंकोजी बुद्ध मंदिरात असलेली रक्षा भारतात अनेकवेळा पाठवण्याचा प्रयत्न केला आहे. भारतीयांच्या दृष्टीने ही रक्षा नेताजींची नाही....पण या संदर्भातील मत मतांतर आणि सरकारी काम याविषयी एक प्रकरण आहे.सुन्न करणारी यातील माहिती आहे.

एकूणच हे पुस्तक फारच विस्फोटक आहे.नेताजी जर जिवंतपणी भारतात परतले असते तर ? काय झाले असते ? म्हणून ते जिवंतपणे भारतात परतणार नाहीत याची काळजी घेतली गेली असेल का?विमान अपघात ही निव्वळ बनवलेली कथा ! नेताजी रशियात गेले! तिथेच तुरुंगात त्यांना राहावे लागले....भारतात परतले तरीही ते इंग्रजांच्या ताब्यात दिले जाणार होते....यात गांधीजी ही सहभागी होते...असेही एक प्रकरणं यात आहे.

 पुस्तकाचे नाव : नेताजींचा मृत्यू भारताचे सर्वात मोठे रहस्य

लेखक : अनुज धर

मराठी अनुवाद : डॉ मीना शेटे संभू

प्रकाशन : विश्वकर्मा पब्लिकेशन्स

आकार :डबल क्रॉउन मोठा आकार

पाने  :४९५

किंमत :६५०/-

सवलत मूल्य:६००/ होम डिलिव्हरी!

9421605019

 

 

 

माघ पौर्णिमा विशेष

 *🟡  माघ पौर्णिमा  🌈🌈🌈🌈🌈                                                                                      🪷आज (०५/०२/२०२३) माघ पौ...