27 February 2022

नोबेल पारितोषिक मिळालेली, कादंबरी

नोबेल पारितोषिक मिळालेली, अर्नेस्ट हेमिंग्वे यांची जगप्रसिद्ध कादंबरी The Old Man And The Sea चा मराठी अनुवाद!

पुस्तक: एका कोळीयाने

मूळ लेखक: अर्नेस्ट हेमिंग्वे

मराठी अनुवाद: पु. ल. देशपांडे

पेज: १५४ हार्ड कव्हर,रंगीत चित्रे

मूल्य:: ३००/ सवलत मूल्य:२७०/

 टपाल:३५ एकूण:३०५/

खरेदीसाठी व्हॉट्सॲप करून नाव, पत्ता, पिनकोड आणि मोबाईल नंबर द्यावा.

ज्ञानसाधना पुस्तकालय:9421605019

पुस्तक परिचय लेखन: विनोद थोरात

The Old Man and the Sea ही प्रसिद्ध अमेरिकन लेखक अर्नेस्ट हेमिंग्वे यांची जगविख्यात कादंबरी. १९५२ साली प्रकाशित झालेली केवळ १२७ पानांची हि कादंबरी एवढी प्रसिद्ध आहे कि जगातील सर्व प्रमुख भाषांमध्ये त्याचे भाषांतर झाले आहे आणि त्याच्या करोडो प्रती विकल्या गेल्या आहेत. याच कादंबरी साठी हेमिंग्वे याना पुलित्झर आणि नोबेल पारितोषिक प्राप्त झाले आहे. मराठीत या कादंबरीचे भाषांतर सुरवातीला वि स खांडेकर करणार होते. परंतु प्रकृती मुळे ते काही भाषांतर करू शकले नाही. नंतर अनेक वर्षे हे काम रखडल्यावर महाराष्ट्राचे लाडके लेखक पु ल देशपांडे यांनी हे काम हाती घेतले आणि दोन तीन वर्षांच्या परिश्रमानंतर १९६५ साली मराठीतील पहिली आवृत्ती प्रसिद्ध झाली. पुलंनी त्याचे नाव 'म्हातारा आणि समुद्र' असे पाठयपुस्तकातल्या धड्याच्या मथळ्यासारखे न ठेवता 'एका कोळीयाने' असे लोकांना भावेल असेच ठेवले.

'एका कोळीयाने' हि कहाणी आहे सान्तियागो या म्हाताऱ्याची. म्हाताऱ्याने आपल्या उमेदीच्या काळात अनेक मोहिमा पार पाडल्यात. पण आता वृद्धापकाळामुळे तो थकला आहे. गेले ८४ दिवस तो प्रयत्न करतोय, पण तरीदेखील त्याला एकही मोठा मासा मिळालेला नाही. पहिले ४० दिवस एक मुलगा त्याच्याबरोबर मासे पकडायला जात होता, पण ४० दिवस एकही मासा न मिळाल्यामुळे त्याच्या वडिलांनी या दळभद्री म्हाताऱ्याबरोबर जायला पोराला मनाई केली. तरीही नंतर म्हातारा ४४ दिवस एकटाच समुद्रावर जात होता.  पण एके दिवशीही एक मोठा मासा त्याच्या गळाला लागला. मासा एवढा मोठा आणि शक्तिशाली होता कि म्हाताऱ्याला एकट्याला त्याला पकडणे खूप मुश्किल होते. पण म्हातारा एवढा पछाडलेला होता कि सलग तीन दिवस प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत तो माशाच्या मागे खोल समुद्रात गेला. या तीन दिवसाच्या काळात म्हाताऱ्याचे माशाबरोबर एक अनामिक नाते तयार झाले. पण पोटापाण्यासाठी म्हाताऱ्याने मोठ्या कष्टाने माशाला मारलेच. मासा एवढा मोठा आणि चविष्ट होता कि म्हाताऱ्याला भरपूर पैसे मिळाले असते. पण माशाच्या मागे म्हातारा किनाऱ्यापासून एवढा दूर आला होता कि परतीची वाट देखील तेवढीच मुश्किल होती. अनेक संकटे त्याची त्या वाटेवर वाट पाहत होती. शेवटी म्हातारा माशाला घेऊन सुखरूप किनाऱ्याला पोहचतो का? त्याला त्याचे पैसे मिळतात का? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला पुस्तक वाचावे लागेल.
 
The Old Man and the Sea हि एक अलौकिक कादंबरी आहे. किनाऱ्यावरून निघाल्यापासून म्हातारा करत असलेला संघर्ष आणि माशाच्या पाठलागावर असताना त्याच्या मनात उठलेले विचारांचे काहूर हा या कादंबरीचा मुख्य गाभा आहे. पु ल देशपांडे यांनी या महान कलाकृतीला न्याय द्यायचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. पण तरीही त्याला भाषांतराच्या मर्यादा आहेतच. पुलंनी स्वतःच स्पष्ट केले आहे कि ज्यांना इंग्रजी भाषेचे ज्ञान आहे त्यांना या भाषांतरामध्ये तितके स्वारस्य वाटणार नाही. पण ज्यांना मराठीच कळते त्याना या महान कलाकृतीचा थोडा तरी आस्वाद घेता याना म्ह्णून त्यांनी हे भाषांतर केले आहे. माझे स्वतःचे वैयक्तिक मत देखील असेच आहे कि ज्यांना मूळ कादंबरी वाचणे शक्य आहे त्यांनी ती जरूर वाचावी. ज्यांना अनुवादित साहित्य वाचनाची आवड आहे त्यांना मात्र हि कादंबरी नक्कीच आवडेल.
         - विनोद थोरात



किरण बोरकर यांनी या पुस्तकाच्या निर्मितीची माहिती दिली आहे.



सुप्रसिद्ध लेखक अर्नेस्ट हेमिग्वे यांच्या नोबेल पारितोषिक प्राप्त कलाकृतीचा पु. ल. देशपांडे यांनी केलेला अनुवाद.

ही कथा आहे एका म्हाताऱ्या कोळ्याची.त्याने भर समुद्रात एका भल्या मोठ्या माशाशी केलेल्या संघर्षाची .....लढाईची....

तो म्हातारा कोळी रोज समुद्रात जातो आणि रिकाम्या हाताने परत येतो. त्याच्या जोडीला शेजारचा तरुण मुलगा आहे पण मासे मिळत नाही म्हणून त्याच्या आई वडिलांनी आज त्याच्याबरोबर जाण्याची परवानगी दिली नाही . एकूण पंच्याऐशी दिवस म्हाताऱ्या कोळ्याला एकही मासा मिळाला नाही . आज तो एकटाच खोल समुद्रात मासेमारी करायला गेला आहे आणि त्याच्या गळात अठरा फूट लांबीचा मासा सापडतो . सलग दोन दिवस  एकटा स्वतःशी बडबडत तो त्या अजस्त्र माश्याशी झुंज देतो.आपला अनुभव पणाला लावून त्याच्यावर विजय मिळवतो आणि त्याला होडीच्या शेजारी बांधून परतीच्या प्रवासाला निघतो.पण परतीच्या प्रवासात त्याला शार्क माश्यांच्या झुंडीशी सामना करावा लागतो . जेव्हा तो किनाऱ्याला लागतो तेव्हा माश्याचा फक्त सांगाडा उरलेला असतो.
 अतिशय रोमांचक असे हे पुस्तक आहे . पु.ल.नी लेखकाचा आदर ठेवून जशास तसा अनुवाद केला आहे . यात कुठेही पु.ल.ची शैली दिसत नाही.

 १९५५ साली वि. स. खांडेकर यांनी लेखकाकडे भाषांतराची परवानगी मागितली आणि त्यांना ताबडतोब मिळालीही. खांडेकरांनी १९५५ ते १९५८ पर्यंत भाषांतराचा प्रयत्न केला पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे हे काम सोडून द्यावे लागले .मग ते काम अनंत काणेकर यांच्याकडे आले . पण कामाच्या व्यापात त्यांनाही ते जमेना म्हणून प्रकाशकाला परत केले . शेवटचा प्रयत्न म्हणून त्यांनी पु.ल.ना विचारणा केली . पु.ल. नी नाकारले असते तर ते पुस्तक मूळ लेखकाला परत करायचे असे ठरले .पु.ल.आणि सुनीताबाईनी चार वर्षानी त्याचे भाषांतर पूर्ण केले . दरम्यान हेमीग्वे यांचा मृत्यू झाला . त्यामुळे हे पुस्तक हेमीग्वे याना पाठविण्याची इच्छा अपूर्णच राहिली .१९६५ साली याची पहिली आवृत्ती प्रसिद्ध झाली . मूळ पुस्तकातील चित्रांपासून सगळे काही जसेच्या तसे देण्याचा प्रकाशकांनी प्रयत्न केला आहे.
                           - किरण बोरकर

ही पोस्ट पुढे पाठवू!

माघ पौर्णिमा विशेष

 *🟡  माघ पौर्णिमा  🌈🌈🌈🌈🌈                                                                                      🪷आज (०५/०२/२०२३) माघ पौ...