13 August 2021

कोल्हापूर

हिंदू धर्मशास्त्रानुसार, प्राचीन काळी केशी राक्षसाचा मुलगा कोल्हासुर हा इथे राज्य करीत होता. याने राज्यात अनाचार व सर्वाना त्रस्त करून सोडले होते. म्हणून देवांच्या प्रार्थनेवरून महालक्ष्मीने त्याच्याशी युद्ध केले. हे युद्ध नऊ दिवस चालले होते . आणि अश्विन शुद्ध पंचमीस महालक्ष्मीने कोल्हासूर या राक्षसाचा वध केला होता. त्यावेळेस कोल्हासूर महालक्ष्मीला शरण गेला आणि त्याने तिच्याकडे आपल्या नगराची कोल्हापूर व करवीर ही नावे आहेत तशीच चालू ठेवावीत असा वर मागितला. त्याप्रमाणे या नगरीला कोल्हापूर वा करवीर या नावाने ओळखले जाते. ["श्री करवीर निवासिनी"]

03 August 2021

 


बाप आडमुठी, हेकेखोर आणि स्वतःचंच खरं करणारा.

आईला 'एऽ रांडं! तुझ्यायच्याऽ तुला हात्ती लावला! तुला गाढाव लावलं!' अशा भाषेत बोलणारा. बापाचं जग म्हणजे घरातून मळा आणि मळ्यातून घर; त्याने ना शाळा पाहिली ना जग. पण तरीही जगाला ज्ञान शिकवणारा. पोराने आवाज केला तर कुऱ्हाडीचा दांडा, खुरप्याची मूठ नाहीतर आसूडाच्या वादीने त्याची कातडी फोडणारा.

आईची कामं म्हणजे बापाच्या घरात-मळ्यात राबायचं; त्याच्या शिव्या-मार खायचा आणि दर दिडदोन वर्षांनी त्याची पोरं काढायची.

आणि पोरगा? त्याला बापाने चौथीनंतर शाळा सोडायला लावून मळ्यातल्या कामाला जुंपला. कारण काय? तर बापाला गावभर हिंडता यावं म्हणून! एका गड्याचा पगार वाचायचा ते वेगळंच.

एकदा गड्याबरोबर पोरगा उसाला पाणी देत होता. त्याला सदऱ्यातून काहीतरी आत गेल्याचं जाणवलं. हाताला काहीतरी टोचल्यासारखं झालं आणि असह्य वेदना सुरु झाल्या. हात वर केला तर ती वस्तू खांद्यावरून पाठीकडे सरकली आणि तिथे तिने दुसरा दणका दिला. त्याने सदऱ्याची बटणं काढून तो सैल सोडल्यावर ती वस्तू खाली घसरली आणि कमरेच्या वरच्या भागावर तिसरा झटका बसला. त्या पोराने हात मागे नेऊन बाहेरूनच ती वस्तू धरली.

'गणपा बघ रे जरा कायहे?' सदरा मागच्या बाजूने उचलून त्याने गणपाला ती वस्तू पहायला लावली.

'इच्चूऽ' गणपा ओरडला. घाबरून त्या पोराने सदरा काढला. त्याने बोटांनी दाबून धरल्याने विंचू अगोदरच अर्धमेला झालेला. विंचवाला खाली टाकून त्यांनी तो रेंगसला.

विंचवाने एखादा दंश करणं ठीक होतं पण तीन तीन दंश!

वेदनेने तो पोरगा उड्या मारू लागला. ऊसाचं पाणी बंद करून गड्याबरोबर त्याने गाव गाठलं. त्याची आई आणि अर्धाडझन भावंडं त्याची अवस्था पाहून रडायला लागली. तीन तीन विंचू चावलेला पोरगा बघायला सगळी आळी लोटली. एका बाईने कसलसं औषध दिलं, त्याला शिंका सुरु झाल्या आणि वेदना थोड्या कमी होऊ लागल्या.

घरी येऊन आराम करणार तर बाप तिथं उपटला. पोराला तीनदा विंचू चावल्याचं त्याला दुःख नव्हतं. उलट उसाला पाणी द्यायचं सोडून पोरगा घरी आला म्हणून बाप संतापला.

'तुझ्यायला तुझ्या! सुक्काळीच्याऽ इच्चू तीनदा चावस्तोवर झोपला व्हता व्हय?'

बापाने त्याला भिंतीच्या कोपऱ्यात रेटला आणि लाथाबुक्क्यांच्या प्रहारांनी त्याला अर्धमेला केला. विंचवाच्या तीन तीन दंशांपेक्षाही बापाचा मार भयंकर होता.

पोरगा घरी आल्याने बापाला मळ्यात पाणी धरायला जावं लागलं. पोराच्या आणि त्याच्या आईचा उद्धार करत तो गड्याला घेऊन मळ्यात गेला.

रोज पहाटे उठल्यापासून रात्री अंधार पडेपर्यंत शेतात राबणाऱ्या त्या पोराला त्या दिवशी विंचवाने दुपारनंतर सुट्टी दिली. शाळा अगोदरच सुटल्यामुळे पोरांची संगत सुटली होती; खेळही सुटले होते. संध्याकाळी पाच वाजता वेदना कमी झाल्यावर तो गल्लीत पोरांमध्ये खेळायला गेला.

किती दिवसांनी त्याने त्याचे मित्र पाहिले आणि त्यांच्याबरोबर खेळायचा आनंदही घेतला! संध्याकाळी तो घरी परतला आणि लगेच 'मळ्यात झोपायला जा' म्हणून बापाने आज्ञा केली.

आता मळ्यात जाताना त्याला वाईट वाटलं नाही कारण आज त्याला खेळायला मिळालं होतं. अकरा वर्षांच्या त्या पोराला मित्रांबरोबर खेळून इतका आनंद झाला होता की त्यासाठी रोज तीन तीन विंचू चावले तरी चालतील असं त्याला वाटलं.

वाचकमित्रहो, असंही एखाद्याचं बालपण असतं!

बापाच्या शिव्या आणि मार सहन करत तो पुन्हा शाळेत जाऊ लागला. सातवीच्या बोर्डाच्या परीक्षेत तो आख्ख्या कागल तालुक्यात पहिला आला पण पेढे वाटायला घरी पैसे नव्हते.

'काय करायचंय त्या नंबराचं?' इति बाप.

'तुमचं पोरगं हुशारहे. त्याला पुढं शाळा शिकू द्या,' कुणीतरी सुचवायचं.

'आन् मळ्यातलं काम काय त्याचा बाप करणार का?' बापाचा उलटप्रश्न. 'आसली थेरं आपल्यापुढं नाय चालायची! शाळंचा नाद म्हंजी एक नंबर भिक्कारचोट!'

मग पोराचं मनगट धरून बाप त्याला मळ्यात न्यायचा. पण पोरगा जिद्दीचा. काही झालं तरी शाळा शिकायचीच!

पोरगा अकरावीच्या बोर्ड परिक्षेला बसला. त्यावर्षी बापाने बारावं पोरगं काढलं. हा सोडला तर सगळी पोरं रोगट. माती खाऊन नाळरोगी झालेली. ती फक्त खायच्याच कामाची. 'ह्या पोरांना मी एकटा खायला घालू काय? तुला मळ्यात काम करायलाच लागंन!' पोराची शाळा बंद करण्यासाठी बापाचा युक्तिवाद.

आणि... असल्या भयंकर बापाच्या नाकावर टिच्चून त्याने आपलं शिक्षण पूर्ण केलं व प्राध्यापक झाला. तो पोरगा म्हणजेच लेखक आनंद यादव.

 

माघ पौर्णिमा विशेष

 *🟡  माघ पौर्णिमा  🌈🌈🌈🌈🌈                                                                                      🪷आज (०५/०२/२०२३) माघ पौ...