05 February 2023

माघ पौर्णिमा विशेष

 *🟡  माघ पौर्णिमा  🌈🌈🌈🌈🌈                                                                                      🪷आज (०५/०२/२०२३) माघ पौर्णिमा आहे.. यालाच पाली भाषेत (माघो) असेही म्हणतात*                

   *ही पौर्णिमा  साधारणतः फेब्रुवारी महिन्यात येते. माघ पौर्णिमेला बुद्धाच्या जीवननात काही महत्वपूर्ण घटना घडल्यात*.

*पहिली घटनाः-विहाराचा* *शोध.वैशाली नगरीत माघ* *पौर्णिमेला अति महत्वाच्या तीन घटना घडलेल्या आहेत. बिहार राज्यातील वैशाली या ठिकाणी भगवंताच्या धातू अवशेषावर बांधलेला एक स्तुप सापडला तो माघ पौर्णिमेलाच. वैशाली मुक्कामी बुध्दांनी आपल्या अंतिम समयी केलेल्या घोषणेस वैशालीवासी व सर्व बौद्ध जनता कदापिही विसरणे शक्य नाही.भगवंताच्या जीवनात व माघ पौर्णिमेस मोठे भावनिक महत्त्व प्राप्त झालेले आहे.भगवंतानी येथे केलेल्या घोषणेमुळे वैशालीनगरी अजरामर झाली.बौद्ध साहित्यातील प्रमुख ग्रंथामध्ये वैशाली नगरीचा उल्लेख महत्त्वाच्या ऐतिहासिक गाथा आणि परंपराच्या संदर्भात अनेक वेळा आढळून येतो. आम्रपाली..वैशालीचीच.. महा प्रजापती गौतमीसह ५०० महिलांना प्रथम दिक्षादिली वैशालीतच.. वैशालीच्या गणतंत्र .पध्दतीवरुन भगवंतानी भिक्खू संघाची रचना केली. द्वितीय संगीती संपन्न झाली. वैशालीतीच...आपल्या जीवनातील दोन वर्षावास(५वा आणि ४६वा तथा अंतिम)भगवंतानी या वैशालीतच पूर्ण केले..*

*वैशाली येथे तथागतांच्या धातू अवशेषावर बांधलेला स्तूप सापडला*

*बुद्धाची महापरिनिब्बाणाची घोषणाभगवंताच्या भिक्षापात्राची भेट*

*वैशालीचे अंतिम दर्शन*

*आनंद श्रमनाचे परीनिब्बाण*

*१🔹वैशाली येथे तथागतांच्या धातू अवशेषावर बांधलेला स्तूप सापडला*

*भगवंताच्या महारीनिब्बाणा नंतर कुशीनगर येथे पवित्र धातू अवशेषांची समान आठ भागांत वाटणी करण्यात आली. त्यापैकी एक वाटणी वैशालीचे लिच्छवींनाही प्राप्त झाली. त्यावर त्यांनी एक स्तूप बांधला. चिनी प्रवासी  हुआन-त्संग  यांच्या प्रवास वर्णनावरून मार्च  १८५८ मध्ये श्री अनंत सदाशिव आल्टेकर यांनी हा स्तूप शोधून काढला. त्यापूर्वी तो मातीच्या ढिगाऱ्याखाली लपलेला होता. भाजलेल्या विटांनी भाजलेला हा साधा स्तूप होता. स्तूपाच्या आत भगवंताच्या पवित्र धातू ठेवलेला एक कुंभ मिळाला*

*२.🔹बुद्धाची महापरिनिब्बाणाची घोषणा*

*वैशाली येथील चापाल विहारात आराम  करीत असतांना भगवंतांनी आपला प्रिय शिष्य आनंद यास जवळ बोलावून म्हणाले हे आनंद!!! तथागत आजपासून तीन महिन्यांनी म्हणजे वैशाखी पौर्णिमेस महारिनिर्वाण पावतील.तो दिवस होता इ.स.पू. ४८४ च्या माघ पौर्णिमेचा.भगवंतांनी घोषित केल्याप्रमाणे वयाच्या ८० व्या वर्षी उत्तररात्री रात्रीच्या तिसऱ्या प्रहरी वैशाख पौर्णिमेस कुशीनगर येथे भगवान  बुद्धाचे शालवृक्षाखाली* *महापरीनिर्वाण झाले*.

*३.🔹भगवंताच्या भिक्षापात्राची भेट*

*तथागतांनी त्यांच्या  महापरिनिब्बानाच्या घोषणेच्या दुसऱ्या दिवशी वैशाली येथील त्यांच्या शेवटच्या चारिकेनंतर शहराच्या बाहेर निघायला लागले, तेव्हा .. त्यांच्या मागे मागे  सर्वलिच्छवी दुःखी मनाने शहराबाहेर चालत आले. त्यांना तथागतांनी मनाई करूनही ते ऐकत नव्हते व मागे-मागे चालतच राहिले. लिच्छवींचा स्नेह,प्रेम व आदर बघून लिच्छवीजवळ* *आपली कोणतीतरी स्मृती राहावी म्हणून त्यांनी त्यांच्या जवळील भिक्षापात्र (चारिकापात्र)  लिच्छवींना दानस्वरुप दिला. ही घटना लिच्छवींनी शीलालेखावर लिहून ठेवली आहे .*

*४🔹. वैशालीचे अंतिम दर्शन*

*भगवान बुद्ध राजगृही गृध्रकूट पर्वतावर राहत होते. तिथे काही काळ वास्तव्य केल्यानंतर अंबलठ्ठिकेला जाण्यासाठी निघाले. नालंदा पाटलिग्राम, कोटीग्राम, नादीका, आणि शेवटी वैशालीला गेले. प्रत्येक ठिकाणी तथागत थांबले आणि उपदेश दिला. तथागत वैशालीला पोहोचल्यानंतर  म्हणाले!!! ही माझी वैशाली नगरीची अंतिम भेट असणार आहे. ही वार्ता संपूर्ण वैशालीत वाऱ्यासारखी पसरली, वैशालीतील सर्व लोक दुःखी, खिन्न, व्यथित झालीत. भोजन  केल्यानंतर तथागतांनी आनंदासह कुसुमावती नदीच्या घाटावरील उंच ठिकाणी चढून संपूर्ण वैशालीचे दर्शन घेतले. वैशालीचे दर्शन घेऊन कायमचे सोडून जाण्यास निघाले. वैशालीला सोडताना  वारंवार मागे वळून.वळून  बघत होते. एवढे प्रेम तथागतांचे  वैशालीवर होते.*

*५🔹.आनंद श्रमनाचे परीनिब्बाण*

*तथागतांप्रमाणे स्थविर आनंदाला सुद्धा आपले परिनिर्वाण समीप आल्याचे आधीच समजले. त्यांना  सुद्धा वाटले की आपले परिनिर्वाण वैशालीलाच व्हावे. आनंद सुद्धा राजगृह सोडून वैशालीला जाण्यास निघाले. वैशालीला स्थविर आनंद येत असल्याची वार्ता कळताच, लिच्छवी स्वागतास तयार होते. परंतु स्थविर आनंदास वाटले की वैशालीस गेलो तर राजा अजातशत्रू यास वाईट वाटेल  आणि माघारी गेलो तर लिच्छवी नाराज होणार म्हणून यावर उपाय म्हणून पाच नदीचा संगम असणाऱ्या नदीच्या मध्यभागी गेले आणि त्या नदीच्या मध्यभागी जाऊन परिनिर्वाण प्राप्त केले. परिनिर्वाण समयी त्याचे वयोमान १२० वर्षे होते.  मगध नरेश अजातशत्रू व वैशालीचे लिच्छवी या दोघांनी स्थविर आनंदाचा अंत्यविधी गंडकी नदी किनारी पार पाडला. आनंदाच्या  अस्थी अवशेषाचे  समान दोन भाग करण्यात आले. एक भाग मगधाकडे तर दुसरा भाग वैशाली राज्यांनी घेतला. दोन्ही राजांनी अस्थी अवशेष आपल्या राज्यात नेऊन त्यावर स्तूप उभारले. लिच्छवींनी उभारलेला स्तूप वैशालीला आजही पाहायला मिळतो. सम्राट अशोकांनी पुढे त्याचे पक्क्या विटांचा वापर करुन या अर्धांग अवशेष स्तुपाचे पुनरुज्जीवन केले. अशोक स्तंभाच्या बाजूला आजही आहे.या स्तूपाच्या उत्खननात अस्थि रक्षेबरोबर पुढील वस्तू आढळून आल्या.एक  कवडी,काचेचे अमुल्यमणी,सोन्याच्या पुतळ्या,ताब्यांची आहत मुद्रा, रत्नजडीत विटा,किरीटयुक्त वानराची मृणमय मूर्ती  या बाबी विशेष उल्लेखनीय आहेत.* 

☸️ *माघ पौर्णिमेच्या  आपणा सर्वांना मंगलमय शुभेच्छा!!!!*✍️✍️✍️✍️✍️                                                           

 🪷 *शुभेच्छूकः- सुमंगल तथा रविंद्र अहिरे जिल्हा सरचिटणिस भारतीय बौद्ध  महासभा समता सैनिक दल.जळगाव  जिल्हा  पूर्व  विभाग*

माघ पौर्णिमा विशेष

 *🟡  माघ पौर्णिमा  🌈🌈🌈🌈🌈                                                                                      🪷आज (०५/०२/२०२३) माघ पौ...