30 July 2024

आई समजून घेताना

 काही दिवसांपूर्वी दैनिक सकाळ मध्ये सप्तरंग म्हणून पुरवणी येत असे.सदर पुरवणी मध्ये फिरस्ती हे एक सदर होतं बाकीचे छान छान गोष्टी त्याच्यामध्ये येत होत्या त्या रियल गोष्टींची इतकी आवड निर्माण झाली की त्याच्या लेखकाचे आणखीन काही पुस्तक आहेत का वाचायची इच्छा निर्माण झाली त्यातच मला समजले, त्याची लेखक उत्तम कांबळे यांची आई समजून घेताना हे पुस्तक आहे नंतर पाहिलं तर कळल या पुस्तकाची खूप ऐकायला मिळालं तेव्हाच ठरवलं होतं की हे पुस्तक मिळालं की वाचायचं खूप दिवसांनी तो योग आला आणि नेमके ते पुस्तक हातात पडलं खरंच उत्तम कांबळे चे पुस्तक वाचून खूप बरं वाटलं आईला भेटले याचा समाधान लाभले.

आई समजून घेताना 

पोटातील भूक शमवण्यासाठी आवकाने जणू एक फॉर्म्युलाच तयार केला होता, माझ्यात शब्दांत पाणी फॉर्म्युला भूक जास्त लागली असेल आणि खाण्यासाठी अन कमी मिळत असेल तर जेवणापूर्वी भरपूर पाणी प्यावं... जेवता जेवताही प्यावं आणि जेवणानंतरही प्यावं... सबब अन्नाऐवजी पाण्यानेच पोट भरतं... कमी अन्नात भागतं, उपासमारीच्या काळात आणि विशेषतः डायबेटीस पचवण्याच्या काळात मला हा फॉर्म्युला खूप उपयोगी पडला. डायबेटीसवाल्याला खूप कडाडून भूक लागते. भरपूर खावंसं वाटतं अशा वेळी पाण्याचा मारा करून भुकेची धग संपवता येते. काही काळासाठी तरी शांत होते. आक्कानं स्वतः हा फॉर्म्युला आयुष्यभर वापरला. जेव्हा खाण्याचे दिवस आले तेव्हा तिच्या रोगाचेही दिवस आले हातात हात घालून... शस्त्रक्रिया न करता हाइड्रोथेरपीचा वापर करून आणि तिला ... पण आम्ही तिला प्रोत्साहन द्यायचो... बायको

भरपूर पाणी प्यायला सांगून मुतखडा बाहेर पडतो का याचा प्रयोग सुरू झाला... खूपखूप पाणी पिताना ती कंटाळायची... एकसारखं पाणी पिऊन आतडी सुजतील असं म्हणायची

प्रोत्साहन द्यायची... नातवंडं प्रोत्साहन द्यायची... आक्का पी पाणी... आत्या पाणी प्या... आजी पी पाणी... भरपूर पी... आणखी पी... पाणी फॉर्म्युला म्हातारपणी आपल्यावर उलटेल असं तिला कधी वाटलं नसावं.. 

@ उत्तम कांबळे

28 July 2024

बाबासाहेब तुमच्या आयुष्याचा हिशोब लागत नाही

 दोन मिनिट वेळ असेल तर जरूर वाचा..

दिनांक:६ डिसेंबर २०२३ रोजी डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांच्या महाप्रयाण दिनी महानगर पालिकेने काढलेली पुस्तिका, यात अभिवादन पर कव्हर पेज वर हेरंब कुलकर्णी यांनी लिहिलेल जरूर वाचावं.


उणेपुरे मिळालेले ६५ वर्षांचे आयुष्य, त्यात ३० वर्षे शिक्षणात आणि १९४६ नंतरचा काळ दिल्लीत व्यस्त राहिलेला. अवघी २५ वर्षे मिळाली बाबासाहेबांना चळवळ आणि लेखनाला...

त्यात तब्येतीची अजिबात साथ नाही. इतक्या थोड्या काळात हा माणूस नियतकालिके चालवतो, २३ ग्रंथ लिहितो,

शेकडो लेख लिहून

भाषणे करत राहतो.

मनुस्मृती दहन, चवदार तळे, काळाराम मंदिर आंदोलन, शिक्षणसंस्था स्थापना, राजकीय पक्ष स्थापन करुन निवडणुका, गोलमेज परिषद आणि हजारो मैलांचा प्रवास...

वाचन लेखनावरची पकड सुटू न देता...

हे सारे सारे कसे जमवले असेल याचा हिशोब लागत नाही...

आजच्या नेत्यांसारखे विमान, हेलिकॉप्टर हाताशी नाही, मिडिया, इलेक्ट्रॉनिक मिडियामधून पोहोचणे नाही, अनुयायांना संदेश द्यायला Whatsapp नाही की बोलायला फोन नाही...

खडबडीत रस्ते आणि रेल्वेतून गावकुसाबाहेरच्या त्या नॉट रिचेबल वस्त्यावस्त्यावर

कसे पोहोचत असतील त्यांचे संदेश आंदोलनाचे, खेडी सोडण्याचे आणि पोरांना शिकवण्याचे...

पुन्हा ज्यांच्याशी संवाद करायचा, ती सारी माणसे टेक्नोसॅव्ही नसणारी...

फाटकी, निरक्षर, अन्यायाने पिचलेली, भेदरलेली

त्यांना समजेल अशा भाषेत हा पदवी घेतलेला कायदेपंडित कोणत्या सुगम भाषेत बोलला असे

?की ज्या शब्दांनी गावाच्या पाटलासमोर नजर वर न करणारी माणसे थेट व्यवस्थेची गचांडी

पकडू शकली...

न बघितलेल्या या माणसावर कशी श्रद्धा निर्माण झाली असेल त्या खेड्यापाड्यातील माणसांची...

नुसत्या टाइम मॅनेजमेंटसाठी तुमचा अभ्यास करायला हवा बाबासाहेब,

आणि माणसांपर्यंत पोहोचण्यासाठी वापरलेल्या तुमच्या पद्धती समजून घ्यायला हव्यात

कारण आज सगळी साधने हाताशी असूनही आम्ही गावकुसाबाहेरच्या माणसांपासून अनरिचेबल आहोत......

कोसो दूर....

कसे वेगाने पोहोचले असतील बाबासाहेब?

- हेरंब कुलकर्णी अकोले, जि. अहमदनगर

परवड

 || परवड  ||

सप्त पदी चालता चालता,

स्वप्न मनात किती रंगविली,

सुखाचा संसार थाटण्या सख्या,

तुझ्या मागोमाग चालली...

गोंडस बाळे,सुंदर घरकुल,

मनात साठवून ठेवली,

जगंनियंत्याला स्मरून,

तूझ्या मागोमाग चालली...

थोडे दिवस संसार सुखाचा?

चालला होता रडत कढत,

सुचेना घर,"अग"ची याद,

चालली मागे फरफटत...

उद्ध्वस्त स्वप्न,नाही बाळे,

सुरूच राहिले तुझे चाळे,

छातीवर दगड ठेवून,

तूझ्या मागे पळ पळ पळे...

बाटली पाहून पारदर्शक,

नितळ मनाची आतली,

माझ्या पेक्षा तिने तुला,

बग रे मोहिनी घातली.

नको घाव घालू सख्या,

थांबवं रे माझी परवड,

अहेवाचे लेणं लावून,

थांबव माझी वणवण...


श्री. निवृत्ती कोरडे,

८८८८८५१६६६

बोरी बुद्रुक,

शिवभूमि:-जुन्नर,

पुणे / मुंबई

27 July 2024

पाच वर्षात 628 वाघांचा मृत्यू


योगायोग म्हणावं कि काय सांगता येणार नाही काल कोयना डॅम परिसर फिरण्याचा योग्य आला माझा मित्र नितीन पाटील त्याविभागात ग्रामसेवक म्हणून कामकारतो त्याच्या मदतीने त्याठिकाणी असलेलं व्याघ्र प्रकल्प जवळून पाहण्यासाठी गेलो प्रकल्पाची मांडणी आणि नियोजन पाहून खूप छान वाटले.

त्याचा निरोप घेतला आणि घरी परतलो आणि आज सकाळी हाती आलेली माहिती पाहून कसंतरी  वाटले 

 पाच वर्षांच्या कालावधीत नैसर्गिक तसेच अन्य कारणांमुळे ६२८ वाघांचा मृत्यू झाला असल्याची माहिती राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाकडून (एनटीसीए) देण्यात आली. दुसरीकडे वाघांच्या हल्ल्यात ३४९ लोकांचा मृत्यू झाला

असल्याचेही "एनटीसीए " कडून सांगण्यात आले. वाघांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले दोनशेपेक्षा जास्त लोक महाराष्ट्रातले आहेत.

देशात अलीकडच्या काळात २०२३ मध्ये वाघांचा सर्वाधिक मृत्यू झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. २०१९ आणि २०२० मध्ये वाघांच्या हल्ल्यात प्रत्येकी ४९ लोकांचा मृत्यू झाला.

२०२१ मध्ये हीच संख्या ५९ इतकी होती. २०२२ मध्ये ११० तर २०२३ मध्ये ८२ लोकांचा मृत्यू झाला. वाघांच्या हल्ल्यात महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक दोनशे लोकांचा मृत्यू झाला. त्याखालोखाल उत्तर प्रदेशात ५९ आणि मध्य प्रदेशात २७ लोकांचा मृत्यू झाला. २०२२ च्या आकडेवारीनुसार देशातील वाघांची संख्या ३ हजार ६८२ इतकी होती. व्याघ्र

संवर्धनासाठी केंद्र सरकारने १९७३ साली "प्रोजेक्ट टायगर" ची सुरुवात केली होती. देशात सध्या ५५ व्याघ्र संरक्षित क्षेत्र आहेत. याची व्याप्ती ७८ हजार ७३५ चौरस किलोमीटरवर पसरलेली आहे.



एक होता कर्व्हर

 

अधिकाधिक उपभोगांच्या हव्यासामुळे,

एका विचित्र वळणावर सारी मानवजात येऊन ठेपली

आहे. आता आपल्या सर्वांपुढे केवळ दोनच पर्याय उरलेले आहेत.

नैसर्गिक साधनसंपत्तीचा विनाश करणाऱ्या

आजवरच्या या आत्मघातकी मार्गावर

हताशपणे वाटचाल करायची किंवा परत मागे फिरून कार्व्हरने दाखवलेल्या नैसर्गिक साधनसंपत्तीच्या

संवर्धन-विकास-उपयोग-पुनर्भरण या शाश्वत कृषिसंस्कृतीचा स्वीकार करायचा.

भावी पिढ्यांच्या सुख-समृद्धीचा पाया घालायचा असेल तर

प्रत्येक सुजाण नागरिकाने वाचायलाच हवे असे पुस्तक

एक होता करव्हर 

भटक्याचे भारूड


 राज्यपालांचे नामनियुक्त सभासद म्हणून लक्ष्मण माने १९९० ते १९९६ या काळात महाराष्ट्र विधान परिषदेत कार्यरत होते. त्यावेळी निमित्तानिमित्ताने त्यांनी अनेक भाषणे केली, प्रश्न विचारले, प्रस्ताव मांडले. त्यातील निवडक साहित्य या पुस्तकात संग्रहित केले आहे. एक संवेदनाशील लेखक आणि तळमळीचा व तडफेचा कार्यकर्ता म्हणून त्यांनी केलेल्या या मतप्रदर्शनाला आगळे मोल आहे. त्यांचा मुख्य रोख भटक्या-विमुक्तांचे प्रश्न, त्यांना राखीव जागा व सवलती हा आहे आणि त्याचमुळे राज्यशासनातील वर्णव्यवस्था व नोकरशाहीची अनास्था यामुळे ते सतत क्षुब्ध आहेत. त्यांचा हा क्षोभ स्वाभाविकच तेजस्वी भाषेतून व्यक्त होतो

॥ ग्रंथाली ॥ * ॥

विशाखा

म ध्यंतरी मराठी पाठ्यपुस्तकातील कवितेवरून समाज माध्यमांवर मोठा वादंग सुरू होता. त्यात एक बाब ठळकपणे अधोरेखित झाली, ती म्हणजे आजच्या तरुण पिढ...