भारताचे
सर्वात मोठे रहस्य
मृत्यू अटळ ! पण तो जर गूढ असेल तर..... आणि देशाचे नेतृत्व करणाऱ्यांची असेल तर , त्यावर तर चर्चा होईलच ना !
आपल्या
देशातील दोन महापुरुष , ज्यांचे महान नेतृत्व , अफाट कर्तुत्व होते पण त्यांचा अंत मात्र देशासाठी अतिशय क्लेशदायक ठरला. कारण
ते मृत्यू गूढ होते....
ते
म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस आणि लालबहादूर शास्त्री!
अनुज
धर हे एक शोध पत्रकार! त्यांनी या संदर्भात अतिशय खोलात जाऊन, देशविदेशातील लोकांना भेटून, उपलब्ध कागद पत्रांचा
पुरावा म्हणून वापर करून,व्यवस्थेच्या ,सरकारच्या विरोधात जाऊन लिखाण
केलं....त्यांची ही दोन पुस्तकं !
v नेताजींचा मृत्यू भारताचे सर्वात मोठे रहस्य
अनुज
धर यांनी लिहिलेले पुस्तकं विशेष सवलतीच्या दराने उपलब्ध !
पुस्तक
उघडताच वाचकाला पहिला धक्का बसतो.अजून पुस्तकाची सुरुवात ही झालेली नसते !
त्याआधीच लेखक स्पष्टपणे लिहितो,नेताजींच्या मृत्युचा शोध
घेण्यात सरकारने मुद्दामहून अडथळे आणले.ज्यांच्या आधारे लेखक लिहितो त्या गोपनीय
कागदपत्रांचे उतारे आणि फोटो पुस्तकात वाचकांना वाचायला मिळतात हे त्यापेक्षा ही
मोठे आश्चर्य आहे... कारण यातील बरीच कागदपत्र अजूनही गोपनीय आहेत !
महानायक
नेताजी! भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात ज्यांनी प्राण ओतला.निस्तेज झालेला
स्वातंत्र्यलढा ज्यांनी ढण ढना पेटवला!
तरुणांचे
ताईत ! उभ्या भारताचे लाडके नेते!गांधीजींनी उभ्या केलेल्या उमेदवाराला हरवून जे
काँग्रेस चे अध्यक्ष झाले होते ! काँग्रेस मधील गांधी गटाने त्यांचे नेतृत्व
अकार्यक्षम व्हावे यासाठी लागतील ते प्रयत्न केले.शेवटी तर त्यांना काँग्रेस मधून
बहिस्कृत करून माफी मागण्यास सांगितले.
ब्रिटिश सरकारच्या नजरेत धूळ फेकून वेषांतर करून काबूल- मास्को मार्गे बर्लिन
ला जाऊन भारतासाठी प्रयत्न केले.जर्मनीत हिटलर शी बोलले. तेथून पाणबुडी ने
पाण्याखालून प्रवास करून जपान ला पोहचले.
आझाद हिंद सेनेची आणि आझाद हिंद सरकारची कमान सांभाळली! चलो दिल्ली म्हणून
भारतच्या स्वातंत्र्यासाठी थेट युद्धाला सुरुवात केली! अशा या लोकप्रिय नेत्याचा
दुर्दैवी अंत कसा झाला हेच भारतीय जनतेला अजून माहीत नाही !
हे पुस्तक लिहिणे ही एक मोठा पराक्रम आहे.कारण यातील अनेक कागदपत्र आणि नावे
खूप मोठ्या व्यक्तींकडे निर्देश करतात.दहा वर्षे अभ्यास करून लिहायला सुरू केलेला
हा शोध ग्रंथ इंग्रजी भाषेत तुफान लोकप्रिय ठरला.विक्रीचे अनेक रेकॉर्ड मोडले.असा
हा ग्रंथ आपल्यासाठी मराठी भाषेत!
या पुस्तकातील एकेक उतारा आणि एकेक वाक्य भयंकर वास्तवाला समोर आणणारे
आहे.आपले अनेक समज हे गैरसमज आहेत हे वाचकाला पुस्तक वाचताना समजायला
लागते.पुस्तकाच्या पहिल्या प्रकरणात माहितीच्या अधिकारात लेखकाने मागितलेल्या
कागदपत्रांचा तपशील त्यांना मिळणार नाही याची पूर्ण काळजी सरकारी अधिकाऱ्यांकडून
घेतली जात होती.कमी महत्वाचे आणि बिन महत्वाची कागपत्रे उपलब्ध करून दिली जात
होती.आम्ही म्हणू ती पूर्व असा स्वभाव झालेल्या बाबू लोकांना माहितीच्या अधिकाराचा
त्रास होऊ लागला...सरकारला नेताजींच्या मृत्युचा शोध घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न
करू द्यायचा नव्हता असे स्पष्ट दिसून येते.
नेताजींच्या मृत्यू सारखेच अजून एक गूढ होते आझाद हिंद सरकारच्या प्रचंड
खजिन्याचे!रोख रक्कम जी जपानी येन मध्ये होती.पण त्या पेक्षा कितीतरी अधिक खजिना
हा सोन्याच्या स्वरूपात होता.या खजिन्याचे पुढे काय झाले? नेताजींचे सहकारी यात सामील झाले का? जे
पुढे सरकारचे ही काम करू लागले.अय्यर त्या पैकी एक! ज्यांना या खजिन्याची पूर्ण
माहिती होती.त्यांनीच त्याची योजना केली होती.भारत सरकारला हवा असलेला
"अर्थपूर्ण " व्यवहार करून भारत
सरकारला त्यांनी सहाय्य केलं होते.स्वाभाविक त्यांच्यावर अनेक इतर सहकाऱ्यांचा रोष
होता...संशयाची सुई त्यांच्याकडे थेट येऊन थांबत होती.
भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे नेताजींच्या मृत्युचा शोध घ्यायला
फारसे उत्सुक नव्हते, हे त्यांनी दिलेल्या वेगवेगळ्या वेळी
उत्तरातून दिसून येते.सुरुवातीला केंद्रीय गृहमंत्री सरदार पटेल सरकार अजून कोणत्याही
उत्तरासाठी असमर्थ आहेत असे सांगत.पण त्याच काळात नेहरू मात्र ,'मला यात कोणताही संशय नाही.'अशी ठाम भूमिका घेत!
पंतप्रधानच स्वतः परराष्ट्रमंत्री असल्याने ही अनेक गोष्टींना न्याय मिळत नव्हता
हे या पुस्तकातून कळते.१९५२ ला संसदेत नेताजींच्या मृत्यू संदर्भात प्रश्न विचारू
दिलेला नव्हता!
जपान सरकारने हा विषय अत्यंत विचित्र हाताळला आहे असेही लक्ष्यात येते.प्रचंड
असलेल्या संपत्तीसाठी तर जखमी नेताजींचा अंत केला गेला नाही ना? असाही प्रश्न वाचकांच्या मनात उठतो.त्याचा तपशील या पुस्तकात विविध पातळीवर
आणि कागद पत्रांचा पुरावा मिळत जाताना दिसतो.
हे पुस्तक वाचून वाचकाने आपले मत बनवले पाहिजे असे वाटते.त्यामुळे यात
असलेल्या अनेक गोष्टी पुस्तकाच्या परिचयात देण्याचे मी टाळत आहे.त्या पैकी एक
म्हणजे " साधू भगवान जी!" जे कायम एकांतात असायचे.कोणाला भेटायचे
नाही.बोलायचे नाही.आपले दर्शन द्यायचे नाही.पण जगाला मात्र ते नेताजी वाटू
लागले.मग असे अनेक साधू वाटायला लागले.....हा प्रकार काय आहे?
जपान मधील रेंकोजी बुद्ध मंदिरात असलेली रक्षा भारतात अनेकवेळा पाठवण्याचा
प्रयत्न केला आहे. भारतीयांच्या दृष्टीने ही रक्षा नेताजींची नाही....पण या
संदर्भातील मत मतांतर आणि सरकारी काम याविषयी एक प्रकरण आहे.सुन्न करणारी यातील
माहिती आहे.
एकूणच हे पुस्तक फारच विस्फोटक आहे.नेताजी जर जिवंतपणी भारतात परतले असते तर ? काय झाले असते ? म्हणून ते जिवंतपणे भारतात परतणार
नाहीत याची काळजी घेतली गेली असेल का?विमान अपघात ही
निव्वळ बनवलेली कथा ! नेताजी रशियात गेले! तिथेच तुरुंगात त्यांना राहावे
लागले....भारतात परतले तरीही ते इंग्रजांच्या ताब्यात दिले जाणार होते....यात
गांधीजी ही सहभागी होते...असेही एक प्रकरणं यात आहे.
लेखक
: अनुज धर
मराठी
अनुवाद : डॉ मीना शेटे संभू
प्रकाशन
: विश्वकर्मा पब्लिकेशन्स
आकार
:डबल क्रॉउन मोठा आकार
पाने
:४९५
किंमत
:६५०/-
सवलत
मूल्य:६००/ होम डिलिव्हरी!
9421605019

No comments:
Post a Comment