15 November 2021

रानातील जीवन

    आज मी फेसबुक वर अपलोड केलेले फोटो चाळत बसलो होतो  अचानक मी 2015 साली अपलोड केलेल्या फोटो समोर आला आणि शाळेतली ते दिवस आठवले आमच्या मराठीच्या शिक्षिका होत्या  सौ. सुलभा देशपांडे बाई त्यांनी मला आणि माझे मित्र अभिजित जोशी अमोल सावगावे व मला कविता लिहाव्या म्हणून खूप प्रोत्साहित केले होते  अक्षरशा त्या दिवसापासून मी व माझा मित्र अभिजीत जोशी रोज एक कविता लिहून मॅडमला दाखवायला लागलो आणि आमच्याकडून मुक्तछंदातल्या तोडक्या-मोडक्या लहान छोट्या चारोळ्या मोठ्या कविता लिहून झाल्या .  त्यावेळी शेतकऱ्यांचा असंच काहीतरी का आंदोलन चालू होतं आणि त्याच आंदोलन वरती मी फेसबुक वरती अशी पोस्ट टाकली होती त्या पोस्ट   खरंतर त्या पोस्टला शोभेल अशी कविता मला दहावीत असताना सुचली होती आणि त्याच वेळी मी ती मॅडमला दाखवली होती  मॅडमनी मला त्याच्या विषयी मार्गदर्शन केलं होतं आधीच कविता मॅडम साठी मी या ब्लॉगवर टाकतोय मॅडम आपल्यात नाहीत याचं दुःख आहेच ही कविता मुझे त्यांचे पुण्यस्मरण समजावे.....

मरण येईना म्हणून जगतोय
तरी जन्मानं चिडवलेलं
भोग भोगतोय जन्माचा
जीन अन्नाला महागलेलं

खोपमधीच नाळ  तोडून
झाडाला अडकवलेलं
उन्हात करपत कवळ कातडं
ढेकळा मधनं वाटलेलं

कसबास कळस्तावर
आई बाप लाभलेला
उसाच्या फाडातलं कामगार जीव 
अनाथ पणानेच वाढलेलं

रानोमळी फडफडातून
रोजचं राबन ठरलेलं
आमच्या नशीबच गाड  मात्र 
पुढाऱ्याच्या दारात अडलेलं

वीतभर पोटासाठी आम्ही टाकतो
कधी कधी जीव   घाण
आमच्या जीवावर ते वाढले
पण  समाजामध्ये तेच महान

                                    यशा.....

https://youtu.be/Z_eVBdbyCyI

1 comment:

विशाखा

म ध्यंतरी मराठी पाठ्यपुस्तकातील कवितेवरून समाज माध्यमांवर मोठा वादंग सुरू होता. त्यात एक बाब ठळकपणे अधोरेखित झाली, ती म्हणजे आजच्या तरुण पिढ...