29 November 2021

विरप्पन विरुद्ध विजय कुमार

 

कल्पनेपेक्षा ही थरारक आणि चित्रपटापेक्षा ही थरारक....एक वास्तविक  ऑपरेशन!एका क्रूरकर्म्याचा जीवघेणा पाठलाग !
 वाचायला सुरू केल्यानंतर हातातील पुस्तका सुटणार नाही असे हे पुस्तक !

 शेकडो हत्ती आणि तितकेच माणसं मारलेला क्रूरकर्मा विरप्पन! लहानपणापासून ज्याला निषानेबाजी आणि शिकार आवडायची!झाडावरून उडी मारताना अनेक वानर त्याने आपल्या ठासनीच्या बंदुकीने टिपले. तो वाढत्या वयासोबत अधिकच क्रूर आणि उलट्या काळजाचा झाला.

हस्तिदंत मिळवण्यासाठी तो हत्तीला एकाच गोळीने ठार करत असे. शेकडो एकर जंगल त्याने चंदन तस्करी करत सपाट केले होते.त्या विरोधात जो जो आला त्याने त्याला टिपले..ते  पोलीस  होते.ते वनाधिकारी होते.ते गावकरी होते.. पोलीसांचे खबरे होते! त्याचे आप्त होते.

स्वतःच्या सुरक्षेसाठी तो वाट्टेल ते करू शकत होता...त्याने स्वतःची मुलगी जी तान्ही होती..पोटचा गोळा त्याच्या....दबा धरून बसलेल्या माणसांचा तिच्या रडण्याने   पोलिसांना कळेल म्हणून तिचा ही त्यानं ....झाडपाला   देऊन काटा काढला!स्वतःसाठी वाट्टेल ते करणारा हा क्रूरकर्मा उत्तर काळात स्वतःला मशिहा सिद्ध करू इच्छित होता.गरिबांचा वाली सांगत होता...हे ही स्वतःला वाचवण्यासाठी केलेलं एक नाटक होते!

त्याने त्याच्या विरूध्द गेलेल्या अनेक कृष्णन सारख्या( SP) पोलीस आधिकाऱ्यांचा काटा काढला..आपल्या मनाची शांती होण्यासाठी त्यांच्या कापलेल्या डोक्याचा फुटबॉल करून त्याला लाथडले! तरीही काही पोलिस त्याच्या मागे हात धुवून लागले.त्याचा शेवट हेच त्यांच्या जीवनाचे ध्येय ठरले होते.त्या पैकी सर्वात प्रमुख म्हणजे लेखक स्वतः के.विजय कुमार!!

नशिबाची साथ व  जंगलं,परिसराची खडा न खडा  माहिती त्या मुळे तो तीन राज्याच्या पोलिसांना गुंगारा देऊ शकत होता.त्यांना आडवून त्यांना ठार करू शकत होता.पोलीस ठाण्यावर हल्ला करून सुरुंग पेरून पोलिसांना तो ठार करत होता.अपहरण ही सुरू केले होते त्याने....

पोलिसांची जिद्द! एसटीएफ मध्ये स्वतः होऊन  नावे दिलेल्या पोलिसांना  परिणामाची जाणीव होती.मृत्यू समोर असताना ही पोलीस ज्या धीरोदात्तपणे लढले ते वाचताना वाचकांना अभिमान वाटतो.

लेखक ज्यांची आयएएस अधिकारी म्हणून निवड झाली होती...तरीही ते आयपीएस अधिकारी म्हणून कार्यरत राहिले.त्यांचे पंतप्रधान सुरक्षा रक्षक म्हणून झालेले जीवघेणे प्रशिक्षण(आल्प्स पर्वताच्या कुशीत) वाचताना ट्रेनिंग कसे असू शकते हे कळते.

या पुस्तकात स्वर्गीय जे.जयललिता यांचा नकळतपणे खंबीर स्वभाव समजतो.लेखकांशी त्या स्वतः फोनवर बोलून STF प्रमुख होण्याचे आवाहन करतात.जखमी पोलिसांना आधार देतात.. विरप्पन चा शेवट करण्याचा निर्धार करतात.

हातात घेतलेले पुस्तक अजिबात सोडावे वाटत नाही.एखाद्या सनसनीखेज थरारक चित्रपटाला शोभवेत तसे बाका प्रसंग एका नंतर एक वेगाने घडतात...वाचक यात इतका गुंतून जातो की जणू तो जंगलात स्वतः आहे.

हे पुस्तक एकट्याने रात्री वाचायला घेतले आणि तो त्यात रमला असताना जर घरात काही वाजले तर नक्कीच घाबरला समजावा इतकं वातावरण निर्माण लेखक करू शकला आहे.यातील नंतरच्या प्रत्येक प्रसंगात लेखक स्वतः सहभागी आहे.नव्हे तोच प्रमुख आहे.

लेखकाने हे पुस्तक तयार करताना प्रत्येक दुवा जोडला आहे.सगळ्या फाईल्स वाचल्या आहेत.पोलिसांच्या भेटी घेतल्या आहेत.खबऱ्या आणि प्रत्येकाला बोलते करून संकलन केले आहे.एकच घटना परस्पर विरोधी पद्धतीने सांगितली असली तरीही लेखकाने त्यातून वाचकाला अधिक सजग केले.समृद्ध केले.

तुम्हाला शौर्य कथा, सनसनीखेज, थरारक चित्रपट आवडत असतील तर हे पुस्तक नक्की आवडेल.पोलिसांच्या कर्तुत्वाचा हा लेखाजोखा वाचताना मीडिया त्यांची कशी अहवेलाना करतो. त्यांची प्रतिमा कशी बिघडून टाकतो याचा ही अंदाज येतो.

वैयक्तिक जीवनातील सुख शांती बाजूला ठेवून लढणारे पोलीस, प्रतिज्ञा घेणारे पोलीस, विरप्पन पकडला जात नाही तो पर्यंत लग्न न करणारे पोलिस, जखमी होऊन,मृत्युला पाहून आलेले पोलीस पुन्हा त्या STF सहभागी होण्यासाठी प्रयत्न करणारे पोलिस...पोलिसांच्या अनेक पैलूंचा येथे परिचय होत जातो.

विरप्पन ची टोळी जी कधी काळी १०० पेक्षा ही जास्त होती ती पोलिसांच्या प्रयत्नामुळे हळू हळू कमी होत गेली.अनेक झटापटी झाल्या.त्यात जसे पोलीस मारल्या गेली तसे त्याचे साथीदार ही मारल्या गेले.काहींनी शरणागती पत्करली....शेवटी विरप्पन अधिक अनुभवी आणि अधिक हुशार होत जातो...

 

पुस्तक: विरप्पन विरुद्ध विजय कुमार

लेखक:    के विजय कुमार

मराठी अनुवाद :  डॉ सदानंद बोरसे

पाने ३८३ किंमत : ३३०   

खरेदीसाठी संपर्क: रावजी लुटे  9421605019

 

1 comment:

विशाखा

म ध्यंतरी मराठी पाठ्यपुस्तकातील कवितेवरून समाज माध्यमांवर मोठा वादंग सुरू होता. त्यात एक बाब ठळकपणे अधोरेखित झाली, ती म्हणजे आजच्या तरुण पिढ...