27 February 2022

नोबेल पारितोषिक मिळालेली, कादंबरी

नोबेल पारितोषिक मिळालेली, अर्नेस्ट हेमिंग्वे यांची जगप्रसिद्ध कादंबरी The Old Man And The Sea चा मराठी अनुवाद!

पुस्तक: एका कोळीयाने

मूळ लेखक: अर्नेस्ट हेमिंग्वे

मराठी अनुवाद: पु. ल. देशपांडे

पेज: १५४ हार्ड कव्हर,रंगीत चित्रे

मूल्य:: ३००/ सवलत मूल्य:२७०/

 टपाल:३५ एकूण:३०५/

खरेदीसाठी व्हॉट्सॲप करून नाव, पत्ता, पिनकोड आणि मोबाईल नंबर द्यावा.

ज्ञानसाधना पुस्तकालय:9421605019

पुस्तक परिचय लेखन: विनोद थोरात

The Old Man and the Sea ही प्रसिद्ध अमेरिकन लेखक अर्नेस्ट हेमिंग्वे यांची जगविख्यात कादंबरी. १९५२ साली प्रकाशित झालेली केवळ १२७ पानांची हि कादंबरी एवढी प्रसिद्ध आहे कि जगातील सर्व प्रमुख भाषांमध्ये त्याचे भाषांतर झाले आहे आणि त्याच्या करोडो प्रती विकल्या गेल्या आहेत. याच कादंबरी साठी हेमिंग्वे याना पुलित्झर आणि नोबेल पारितोषिक प्राप्त झाले आहे. मराठीत या कादंबरीचे भाषांतर सुरवातीला वि स खांडेकर करणार होते. परंतु प्रकृती मुळे ते काही भाषांतर करू शकले नाही. नंतर अनेक वर्षे हे काम रखडल्यावर महाराष्ट्राचे लाडके लेखक पु ल देशपांडे यांनी हे काम हाती घेतले आणि दोन तीन वर्षांच्या परिश्रमानंतर १९६५ साली मराठीतील पहिली आवृत्ती प्रसिद्ध झाली. पुलंनी त्याचे नाव 'म्हातारा आणि समुद्र' असे पाठयपुस्तकातल्या धड्याच्या मथळ्यासारखे न ठेवता 'एका कोळीयाने' असे लोकांना भावेल असेच ठेवले.

'एका कोळीयाने' हि कहाणी आहे सान्तियागो या म्हाताऱ्याची. म्हाताऱ्याने आपल्या उमेदीच्या काळात अनेक मोहिमा पार पाडल्यात. पण आता वृद्धापकाळामुळे तो थकला आहे. गेले ८४ दिवस तो प्रयत्न करतोय, पण तरीदेखील त्याला एकही मोठा मासा मिळालेला नाही. पहिले ४० दिवस एक मुलगा त्याच्याबरोबर मासे पकडायला जात होता, पण ४० दिवस एकही मासा न मिळाल्यामुळे त्याच्या वडिलांनी या दळभद्री म्हाताऱ्याबरोबर जायला पोराला मनाई केली. तरीही नंतर म्हातारा ४४ दिवस एकटाच समुद्रावर जात होता.  पण एके दिवशीही एक मोठा मासा त्याच्या गळाला लागला. मासा एवढा मोठा आणि शक्तिशाली होता कि म्हाताऱ्याला एकट्याला त्याला पकडणे खूप मुश्किल होते. पण म्हातारा एवढा पछाडलेला होता कि सलग तीन दिवस प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत तो माशाच्या मागे खोल समुद्रात गेला. या तीन दिवसाच्या काळात म्हाताऱ्याचे माशाबरोबर एक अनामिक नाते तयार झाले. पण पोटापाण्यासाठी म्हाताऱ्याने मोठ्या कष्टाने माशाला मारलेच. मासा एवढा मोठा आणि चविष्ट होता कि म्हाताऱ्याला भरपूर पैसे मिळाले असते. पण माशाच्या मागे म्हातारा किनाऱ्यापासून एवढा दूर आला होता कि परतीची वाट देखील तेवढीच मुश्किल होती. अनेक संकटे त्याची त्या वाटेवर वाट पाहत होती. शेवटी म्हातारा माशाला घेऊन सुखरूप किनाऱ्याला पोहचतो का? त्याला त्याचे पैसे मिळतात का? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला पुस्तक वाचावे लागेल.
 
The Old Man and the Sea हि एक अलौकिक कादंबरी आहे. किनाऱ्यावरून निघाल्यापासून म्हातारा करत असलेला संघर्ष आणि माशाच्या पाठलागावर असताना त्याच्या मनात उठलेले विचारांचे काहूर हा या कादंबरीचा मुख्य गाभा आहे. पु ल देशपांडे यांनी या महान कलाकृतीला न्याय द्यायचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. पण तरीही त्याला भाषांतराच्या मर्यादा आहेतच. पुलंनी स्वतःच स्पष्ट केले आहे कि ज्यांना इंग्रजी भाषेचे ज्ञान आहे त्यांना या भाषांतरामध्ये तितके स्वारस्य वाटणार नाही. पण ज्यांना मराठीच कळते त्याना या महान कलाकृतीचा थोडा तरी आस्वाद घेता याना म्ह्णून त्यांनी हे भाषांतर केले आहे. माझे स्वतःचे वैयक्तिक मत देखील असेच आहे कि ज्यांना मूळ कादंबरी वाचणे शक्य आहे त्यांनी ती जरूर वाचावी. ज्यांना अनुवादित साहित्य वाचनाची आवड आहे त्यांना मात्र हि कादंबरी नक्कीच आवडेल.
         - विनोद थोरात



किरण बोरकर यांनी या पुस्तकाच्या निर्मितीची माहिती दिली आहे.



सुप्रसिद्ध लेखक अर्नेस्ट हेमिग्वे यांच्या नोबेल पारितोषिक प्राप्त कलाकृतीचा पु. ल. देशपांडे यांनी केलेला अनुवाद.

ही कथा आहे एका म्हाताऱ्या कोळ्याची.त्याने भर समुद्रात एका भल्या मोठ्या माशाशी केलेल्या संघर्षाची .....लढाईची....

तो म्हातारा कोळी रोज समुद्रात जातो आणि रिकाम्या हाताने परत येतो. त्याच्या जोडीला शेजारचा तरुण मुलगा आहे पण मासे मिळत नाही म्हणून त्याच्या आई वडिलांनी आज त्याच्याबरोबर जाण्याची परवानगी दिली नाही . एकूण पंच्याऐशी दिवस म्हाताऱ्या कोळ्याला एकही मासा मिळाला नाही . आज तो एकटाच खोल समुद्रात मासेमारी करायला गेला आहे आणि त्याच्या गळात अठरा फूट लांबीचा मासा सापडतो . सलग दोन दिवस  एकटा स्वतःशी बडबडत तो त्या अजस्त्र माश्याशी झुंज देतो.आपला अनुभव पणाला लावून त्याच्यावर विजय मिळवतो आणि त्याला होडीच्या शेजारी बांधून परतीच्या प्रवासाला निघतो.पण परतीच्या प्रवासात त्याला शार्क माश्यांच्या झुंडीशी सामना करावा लागतो . जेव्हा तो किनाऱ्याला लागतो तेव्हा माश्याचा फक्त सांगाडा उरलेला असतो.
 अतिशय रोमांचक असे हे पुस्तक आहे . पु.ल.नी लेखकाचा आदर ठेवून जशास तसा अनुवाद केला आहे . यात कुठेही पु.ल.ची शैली दिसत नाही.

 १९५५ साली वि. स. खांडेकर यांनी लेखकाकडे भाषांतराची परवानगी मागितली आणि त्यांना ताबडतोब मिळालीही. खांडेकरांनी १९५५ ते १९५८ पर्यंत भाषांतराचा प्रयत्न केला पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे हे काम सोडून द्यावे लागले .मग ते काम अनंत काणेकर यांच्याकडे आले . पण कामाच्या व्यापात त्यांनाही ते जमेना म्हणून प्रकाशकाला परत केले . शेवटचा प्रयत्न म्हणून त्यांनी पु.ल.ना विचारणा केली . पु.ल. नी नाकारले असते तर ते पुस्तक मूळ लेखकाला परत करायचे असे ठरले .पु.ल.आणि सुनीताबाईनी चार वर्षानी त्याचे भाषांतर पूर्ण केले . दरम्यान हेमीग्वे यांचा मृत्यू झाला . त्यामुळे हे पुस्तक हेमीग्वे याना पाठविण्याची इच्छा अपूर्णच राहिली .१९६५ साली याची पहिली आवृत्ती प्रसिद्ध झाली . मूळ पुस्तकातील चित्रांपासून सगळे काही जसेच्या तसे देण्याचा प्रकाशकांनी प्रयत्न केला आहे.
                           - किरण बोरकर

ही पोस्ट पुढे पाठवू!

30 January 2022

गांधी का मारत नाही

गांधी का मरत नाही
लेखक - चंद्रकांत वानखेडे

३० जानेवारी १९४८ रोजी नथुराम गोडसे या माथेफिरूने महात्मा गांधींची तीन गोळ्या झाडून हत्या केली. स्वातंत्र्य मिळून अवघे ५ महिने झालेले असताना ज्या माणसाने देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात अत्यंत महत्वाची भूमिका बजावली त्याची अशाप्रकारे हत्या झाल्यामुळे सर्व देश शोकसागरात बुडाला. पण देशातील काही तथाकथित उच्चवर्णीय मात्र या घेटनेने भलतेच आनंदित झाले. गांधींची हत्या झाल्याच्या आनंदात त्यांनी पेढे देखील वाटले. त्याला त्यांनी गांधीवध असे गोंडस नाव दिले. पण क्रियेला प्रतिक्रिया म्हणून अनेक ठिकाणी या उच्चवर्णीयांची घरे जाळण्यात आली. ज्या माणसाने आयुष्यभर जगाला अहिंसेची शिकवण दिली त्याच्या नावाने असा हिंसाचार होणे खरेच दुर्दैव होते. पण त्यासाठी देखील या उच्चवर्णीयांनी नथुरामला दोषी न ठरवता गांधींनाच दोष दिला. पुढे कोर्टात गांधी हत्येचा खटला उभा राहिल्यावर नथुरामने कोर्टात आणि त्याच्या अनुयायांनी कोर्टाबाहेर गांधी हत्येचे समर्थन करण्याचा खूप प्रयत्न केला. नथुरामला खरा ठरवण्याचे आणि गांधीला बदनाम करण्याचे प्रयत्न गांधी हत्येच्या ७४ वर्षां नंतरही जोमाने चालू आहेत. पण तरीही या सगळ्यांना पुरून उरत गांधी नावाचा म्हातारा करोडो भारतीयांच्या मनात का जिवंत आहे आणि त्याला मारण्याची खरी कारणे नक्की होती तरी कोणती याचा सांगोपांग उहापोह लेखक चंद्रकांत वानखेडे यांनी आपल्या 'गांधी का मरत नाही' या पुस्तकात केलेला आहे.

१९१६ साली गांधी दक्षिण आफ्रिकेहून भारतात परत आले तेव्हा स्वातंत्र्य लढ्याची सर्व सूत्रे लोकमान्य टिळकांकडे होती. १९२० साली टिळकांच्या मृत्यूनंतर ही सूत्रे गांधींकडे आली. पण त्यापूर्वी 'ब्रिटिशांनी भारतीय स्वातंत्र्य पेशव्यांकडून म्हणजे ब्राह्मणांकडून हिरावलेले असल्यामुळे ते परत घेण्याची जबाबदारी आणि हक्क ब्राह्मणांचाच आहे' असे मानणारा मोठा वर्ग स्वातंत्र्य लढ्यात कार्यरत होता. पण त्यामुळे स्वातंत्र्यलढा केवळ काही उच्चवर्णीय लोकांपुरता मर्यादित राहून समाजातील बहुसंख्य गोरगरीब जनतेचा त्यातील सहभाग खूप अल्प होता. गांधीनी मात्र स्वातंत्र्य कशासाठी व कोणासाठी तर या देशातल्या शेवटच्या माणसांसाठी, शेतकऱ्यांसाठी, कष्टकरी जनतेसाठी व त्यांच्या सुखासाठी असे म्हणायला सुरुवात केली. त्यांनी मुंबई, दिल्ली, पुणे यासारख्या शहरातील स्वातंत्र्य लढा चंपारण्य, खेडा यांसारख्या ग्रामीण भागात पोहोचवला.  ज्या अस्पृश्यांना समाजात देखील दुय्यम स्थान होते त्यांना स्वातंत्र्य लढ्यात सहभागी करून घ्यायचे महत्त्वपूर्ण कार्य गांधीजींनी केले. 'अस्पृश्यता हा हिंदू समाजावरील डाग आहे' असा ठराव नागपूरच्या काँग्रेस अधिवेशनात संमत करण्यात आला. एकूणच काय तर ज्या शुद्रातिशूद्रांना प्रतिष्ठा नाही, त्यांच्या श्रमाला किंमत नाही आणि ज्यांना स्वतःला किंमत नाही त्या सर्वांना सन्मान, किंमत आणि प्रतिष्ठा मिळवून देणे हाच गांधींच्या स्वातंत्र्याचा अर्थ होता आणि ध्यासही होता. गांधी असा स्वातंत्र्य लढ्याची ढाल करत सामाजिक परिवर्तन करू लागल्यामुळे वर्णवर्चस्व आणि वर्ण श्रेष्ठत्वाचा दंभ असलेल्या उच्चवर्णीयांमध्ये पोटशूळ निर्माण होणे साहजिकच होते. गांधी बद्दल घृणा निर्माण व्हायला सुरवात तेथूनच झाली. 'एखादया वकिलाच्या कामाइतकीच न्हाव्याच्या कामादेखील किंमत आहे, कारण आपण करतो त्या कामातून उदर निर्वाह मिळवण्याचा अधिकार सर्वानाच आहे' असे ते म्हणत. त्यामुळे प्रत्येकाने आपली जात न पाहता शरीरश्रम केले पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. त्यामुळे जन्माच्या आधारावर मिळालेले श्रेष्ठत्व गांधी कर्माच्या आधारे घालवू पाहत असेल तर त्यालाच या जगातून घालवलेला बरा अशी भावना हिंदुत्ववाद्यांच्या मनात निर्माण न होती तर आश्चर्यच. त्यात त्यांनी आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन दिले. त्यामुळे अशाप्रकारे कर्मसंकर आणि वर्णसंकर करणारा गांधी उच्च वर्णीयांना रुचणार तरी कसा. 

गांधी मुस्लिम धार्जिणे होते, मुसलमानांना नेहमी झुकते माप देत असल्यामुळेच फाळणी झाली आणि पाकिस्तानला ५५ कोटी पण गांधीमुळेच द्यावे लागले असा युक्तिवाद गोडसे समर्थकांकडून नेहमीच केला जातो. गंमत म्हणजे १९१६ साली लखानौ तेथील अधिवेशनात मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ द्यायचे कबूल टिळकांनीच केले होते. भलेही त्यावेळी हिंदू मुस्लिम ऐक्य राखण्यासाठी त्यांनी अपरिहार्यपणे ते मान्य केले असेल. पण भविष्यातील पाकिस्तान निर्मितीची बीज त्यातच होती. पण म्हणून कोणी टिळकांना मुस्लिम धार्जिणे म्हणत नाही. हिंदुत्ववादी गांधींना मुस्लिम धार्जिणे म्हणत असताना मुस्लिम लीगला मात्र तर मुस्लिम विरोधी वाटत असतं. एकच माणूस एकावेळी दोन्ही कसे काय असू शकतो? लेखक म्हणतो, 'गांधी असलाच तर केवळ माणूसधार्जिणा होता. जात, धर्म, भाषा, प्रांत, देश याची कोणतीही चौकट न मानता, बंधनात न अडकता , बंधना पलीकडे जाऊन तो केवळ माणसांवर प्रेम करणारा होता.' गांधी स्वतःला सनातनी हिंदू म्हणत असतं. ते म्हणत, 'मी हिंदू धर्मावर प्राणापेक्षाही अधिक प्रेम करत असल्याने , मला या अस्पृश्यतेच्या कलंकाचा भार असह्य होऊ लागला आहे'. अहिंसेच्या मार्गाने सत्याचा शोध घेणे म्हणजे हिंदू धर्म, हीच त्यांची हिंदू धर्माची व्याख्या होती. गांधी अस्पृश्यता निवारण्यासाठी प्रयत्न करतात, हरिजनांच्या मंदिरप्रवेशासाठी चळवळ चालवतात; म्हणून गांधी धर्मच बुडवायला निघाला आहे या द्वेषातून काही धर्म मार्तंडांनी १९३४ साली हरिजन यात्रेच्या दरम्यान त्यांच्यावर पहिला प्राणघातक हल्ला केला. 

नथुरामने केवळ ५५ कोटींचा बदला म्हणून गांधींचा खून केला असता तर त्याआधी त्यांच्यावर ३ प्राणघातक हल्ले का करण्यात आले? ते ५५ कोटी देखील फाळणीच्या वेळी रिझर्व्ह बँकेच्या शिल्लक असलेल्या रकमेचे वाटप झाले त्यातीलच होती. पाकिस्तानच्या निर्मितीचे नथुरामला एवढेच वाईट वाटत होते तर पाकिस्तान निर्मितीमध्ये महत्वाचा वाटा असलेल्या महमद अली जीना यांना न मारता त्याने गांधींना का मारले? याचे उत्तर मात्र त्याचे समर्थक देऊ शकत नाही. कारण गांधी हत्येचे खरे कारण तात्कालिक नसून स्वातंत्र्य लढ्यातील अभिजनांचे वर्चस्व झुगारून बहुजनांच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि त्याद्वारे सुरू केलेली अस्पृश्यता निवारण्याची सामाजिक क्रांती हेच होते. एकट्या गांधींमुळे हिंदुस्थानातील विविध समाज समूह जेवढे जवळ आले, तेवढे पूर्वी कोणाही पुढाऱ्यांमुळे आले नाहीत. शेतकरी, कष्टकरी, श्रमजीवी, अस्पृश्य, स्त्रिया यांना स्वातंत्र्याच्या केंद्रस्थानी आणि पर्यायाने सत्ताकेंद्राच्या कक्षेत आणण्याचा प्रयत्न गांधीनी केला आणि दुर्दैवाने तेच त्यांच्या हत्येचे कारण बनले. 
 
गांधीहत्या होऊन आज ७४ वर्ष झाली. पण गांधींची मोहिनी अजूनही केवळ भारतावरच नाही तर जगावर आहे. जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, राजेंद्र प्रसाद, चक्रवर्ती राजगोपालाचारी, विनोबा भावे, साने गुरुजी, सरोजिनी नायडू, आचार्य कृपलानी, महादेवभाई देसाई यांसारखे नेते तर त्यांचे शिष्य होतेच पण घनश्याम बिर्ला , अंबालाल साराभाई, जमनालाल बजाज, प्राणजीवन मेहता यांसारखे उद्योगपती देखील होते. गांधीनी मानव जातीला समूहाच्या संघर्षाचे एक अभिनव आणि सुसंस्कृत साधन दिले, त्याचे नाव सत्याग्रह. त्यामुळेच जगभरात त्यांचे अनुयायी निर्माण झाले. मार्टिन ल्युथर किंग, जॉर्ज बर्नार्ड शॉ, नेल्सन मंडेला, डेस्मंड टूटू, हो चिन मिन्ह पासून ते अगदी अलीकडचे दलाई लामा, आंग की स्यून, बराक ओबामा या सर्वांचे प्रेरणास्थान महात्मा गांधी आहेत. जगविख्यात शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन तर एवढे म्हणाले होते की, 'असा कोणी हाडामासाचा माणूस या पृथ्वीवर जन्माला आला होता यावर पुढील पिढ्यांना कदाचित विश्वास बसणार नाही'. गांधीजींचे अहिंसा आणि सत्याग्रह तत्व काय कमाल करू शकते हे आपण नुकतेच शेतकरी आंदोलनात पाहिले. एक वर्ष थंडी पाऊस उन यांची पर्वा न करता सामान्य गरीब शेतकरी दिल्ली सीमेवर बसून राहिले आणि शेवटी त्यांच्या समोर सरकारला झुकावेच लागेल. व्यक्तिगत पराक्रम गाजवण्यापेक्षा समुहाचा पराक्रम जागवणे खूप अवघड कार्य आहे. पण ते गांधीनी केले. भारतीय समाजातील शेवटच्या घटकापर्यंत लोकशाही पोहचवण्याचे महान कार्य गांधीनी केले. त्यामुळेच कदाचित आज आपल्या देशात लोकशाही टिकून आहे. दुर्दैवाने गांधींचे विचार संपण्याचा सर्वाधिक प्रयत्न भारतातच सध्या सुरू आहे. विशेषतः गेल्या ७ वर्षात नथुरामचे उदात्तीकरण आणि गांधींची बदनामी करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहे. पण आपण हे प्रयत्न हाणून पाडायला हवे. त्यासाठी गांधी वाचायला हवा. वानखेडे सरांनी अगदी सहज सोप्या भाषेत गांधी का मरत नाही आणि तो का मरणार नाही याची मुद्देसूद मांडणी केलेली आहे. गांधीं बद्दलचे सारे गैरसमज दूर करण्यासाठी आणि त्यांचे विचार पुढील पिढ्यां पर्यंत पोहचवण्यासाठी  'गांधी का मरत नाही' हे पुस्तक तुम्ही वाचाच.

07 December 2021

इगो इज द् एनिमी

इगो इज द् एनिमी
अहंम् अर्थात इगो!

इगो लेव्हल सोडून मोठा होतो तेंव्हा अशा माणसाला दुसऱ्या शत्रुची गरज पडत नाही.स्वतःचा "इगो" च त्याच्या प्रगतीला खीळ घालतो.
थोडा विचार केला तर आपल्या लक्ष्यात येईल नात्यांमधील दुरावा, मैत्रीत निर्माण होणारी तेढ,नोकरी व्यवसायात थांबलेली प्रगती, वैर आणि शत्रुत्व याला कोणत्या ना कोणत्या प्रकारे इगो कारणीभूत असतो.
रावणाची शक्ती ,भक्ती,बुध्दी प्रचंड असूनही त्याचा लय झाला तो केवळ त्याच्या इगो मुळे!
द्रौपदी मुळे कर्ण आणि दुर्योधनाचा इगो दुखावला गेला होता...पुढे महाभारत घडले.

पण या इगो ला जर आपण सुपर इगो बनवले तर? मग त्यातून जे तयार होते ,ते अतिशय भव्य असते.ते कसे या पुस्तकातून समजते.काय आहे हे पुस्तक?
ऑबस्ट्रकल इज द् वे', ह्या पुस्तकात रायन हॉलिडे जीवन प्रवासातील बाह्य अडथळ्यांचा, तर आपल्या नव्या कोऱ्या पुस्तकात म्हणजेच, 'इगो इज द् एनिमी' मध्ये रायन आंतरिक अडथळ्यांचा वेध घेत, आपल्या तळहातावर व्यावहारिक आणि प्रेरणादायक तत्वज्ञान ठेवतो. या ग्रंथाच्या निमित्ताने इतिहासाच्या उदरात, शतकानुशतके मागे जाऊन नानाविध शक्तिशाली संकल्पनांचा अभ्यासपूर्ण शोध रायन यांनी घेतला आहे. तो वाचण्यासारखा आहे.
  'अहंकार हा आपला सर्वात मोठा शत्रू असल्याचे प्रतिपादन रायन यांनी आपल्या 'इगो इज द् एनिमी' या नव्या पुस्तकात केले आहे. रायन म्हणतो: 'तुम्हा-आम्हा सर्वांच्या कारकीर्दीच्या प्रारंभी, कौशल्ये शिकताना वा विकसित करताना, आपल्याला आपला अहंकारच प्रतिबंधित करीत असतो. जेव्हा आपण यशाची चव घेतो, तेव्हा अहंकार आपल्या स्वतःच्या चुकांकडे डोळेझाक करायला लागतो. अहंकार आपल्याला इतरांपासून सहजपणे दूर करीत एकटे पाडतो. यातून आपण अधःपतीत होऊ लागतो. एकूणच, अहंकार विनाशकारी असल्याचे रायन आपल्या निदर्शनास आणून देतो. म्हणूनच 'मी'पणाला अहंकाराला आपण वेळीच ओळखायला हवे! तसे झाले तरच, आपण आपले कार्य पूर्ण क्षमतेने करू शकू!

  आपल्या इच्छा-आकांक्षांच्या मागे धावताना वर्तमानाचे भान आपण सोडता कामा नये! मुख्य म्हणजे, आपण नम्र राहिले पाहिजे. मोठे यशवैभव प्राप्त झाल्यानंतरदेखील आपले पाय जमिनीवर घट्ट रोवलेले हवेत! यशापेक्षा अपयशातून आपल्याला खूप काही शिकता येते. त्यासाठी आपण लवचिक आणि ग्रहणशील राहिले पाहिजे. अहंकाराला हद्दपार करीत, नम्रता आणि आत्मविश्वास या दोन गोष्टी जर तुमच्याकडे असतील, तर तुम्ही वास्तवाचा सहजपणे सन्मान करू शकाल! हा रायन हॉलिडेचा सांगावा आहे.
पुस्तक:इगो इज द् एनिमी'
लेखक:रायन हॉलिडे
मराठी अनुवाद: डॉ कमलेश सोमण आणि जीवन आनंदगावकर
प्रकाशन: गोयल प्रकाशन
पृष्ठ:२७२
मूल्य:२५०/ टपाल:३०/ एकूण:२८०/
खरेदीसाठी व्हॉट्सॲप करून नाव, पत्ता, पिनकोड आणि मोबाईल नंबर
 9421605019

06 December 2021

अन्न

 

शरद ऋतूतील एक उज्ज्वल दिवस, मुंग्यांचे एक कुटुंब उबदार सूर्यप्रकाशात कामात व्यस्त होते. उन्हाळ्यात त्यांनी साठवून ठेवलेले धान्य ते कोरडे करत असताना एक उपाशी टोळ आले.

 हात मध्ये  सारंगी घेऊन टोळ आला , टोळ नम्रपणे खाण्यासाठी काहीतरी खाऊ  मागू लागला. त्याचे बोलणे ऐकताच 

" मुंग्या ओरडल्या, “तुम्ही हिवाळ्यासाठी अन्न साठवले नाही का ?  उन्हाळ्यात तू झोपला  होतस कि काय  ?”

टोळ म्हणाला ." हिवाळ्यापूर्वी अन्न साठवण्यासाठी माझ्याकडे वेळ नव्हता,"  "मी संगीत करण्यात खूप व्यस्त होतो की उन्हाळा उडून गेला."

मुंग्या फक्त खांदे सरकवत म्हणाल्या, “संगीत बनवत आहात ना ? खूप छान, आता नाच !” मग मुंग्यांनी टोळाकडे पाठ फिरवली आणि कामावर गेल्या ...

https://cdn.shopify.com/s/files/1/0292/2958/0367/products/images_26_4db4d0c3-43f3-44cd-8fa8-5965c6b720cb_442x694.jpg?v=1605990391


05 December 2021

गुलाब

 एके काळी,  वाळवंटात, एक गुलाबाचे झाड होते त्याला खूप  सुंदर गुलाबाची लागलेली असत व ती  दिसला  खूप  सुंदर होती त्या झाडाला आणि त्याच्या फुलांना त्यांच्या सुंदर त्यात  खूप अभिमान वाटत होता.

 त्या झाडाची  एकच तक्रार होती  त्याच्या समोरच एक कुरुप निवडुंगाचे झाड वाढत होते.  गुलाबाचे झाड रोज  निवडुंगाचा अपमान करायचे  आणि त्याच्या दिसण्यावरून त्याची थट्टा करायचा, तर निवडुंग शांत बसून असल्याचं तो गुलाबाच्या झाडाला प्रतिउत्तर देत नसे . आजूबाजूच्या इतर सर्व वनस्पतींनी गुलाबाला समजवण्याचा प्रयत्न केला . परंतु ते झाड व त्याची फुले  स्वत: च्या दिसण्याने खूप गर्विष्ठ  झाली होती .

एक  काय झाले  वाळवंटात कडक  उन्हाळा पडला , वाळवंट कोरडे झाले आणि झाडांना पाणी उरले नाही. गुलाब पटकन कोमेजायला लागला. तिच्या सुंदर पाकळ्या सुकल्या, त्यांचा हिरवा रंग निस्तेज झाला 

त्यावेळी त्याची नजर निवडुंगाकडे गेले निवडुंगाकडे पाहत असताना गुलाबाच्या लक्षात आले  एक चिमणी पाणी पिण्यासाठी आपली चोच निवडुंगाच्या पानात  बुडवताना दिसली. 

शरमेने चूर झालेल्या    गुलाबाने निवडुंगाला  विचारले की तिला थोडे पाणी मिळेल का ? दयाळू निवडुंगाने  सहज सहमती दर्शवली आणि कठीण उन्हाळ्यात त्यांना मित्र म्हणून मदत केली.


इगो इज द् एनिमी

इगो इज द् एनिमी
अहंम् अर्थात इगो!

इगो लेव्हल सोडून मोठा होतो तेंव्हा अशा माणसाला दुसऱ्या शत्रुची गरज पडत नाही.स्वतःचा "इगो" च त्याच्या प्रगतीला खीळ घालतो.
थोडा विचार केला तर आपल्या लक्ष्यात येईल नात्यांमधील दुरावा, मैत्रीत निर्माण होणारी तेढ,नोकरी व्यवसायात थांबलेली प्रगती, वैर आणि शत्रुत्व याला कोणत्या ना कोणत्या प्रकारे इगो कारणीभूत असतो.
रावणाची शक्ती ,भक्ती,बुध्दी प्रचंड असूनही त्याचा लय झाला तो केवळ त्याच्या इगो मुळे!
द्रौपदी मुळे कर्ण आणि दुर्योधनाचा इगो दुखावला गेला होता...पुढे महाभारत घडले.

पण या इगो ला जर आपण सुपर इगो बनवले तर? मग त्यातून जे तयार होते ,ते अतिशय भव्य असते.ते कसे या पुस्तकातून समजते.काय आहे हे पुस्तक?
    ऑबस्ट्रकल इज द् वे', ह्या पुस्तकात रायन हॉलिडे जीवन प्रवासातील बाह्य अडथळ्यांचा, तर आपल्या नव्या कोऱ्या पुस्तकात म्हणजेच, 'इगो इज द् एनिमी' मध्ये रायन आंतरिक अडथळ्यांचा वेध घेत, आपल्या तळहातावर व्यावहारिक आणि प्रेरणादायक तत्वज्ञान ठेवतो. या ग्रंथाच्या निमित्ताने इतिहासाच्या उदरात, शतकानुशतके मागे जाऊन नानाविध शक्तिशाली संकल्पनांचा अभ्यासपूर्ण शोध रायन यांनी घेतला आहे. तो वाचण्यासारखा आहे.
      अहंकार हा आपला सर्वात मोठा शत्रू असल्याचे प्रतिपादन रायन यांनी आपल्या 'इगो इज द् एनिमी' या नव्या पुस्तकात केले आहे. रायन म्हणतो: 'तुम्हा-आम्हा सर्वांच्या कारकीर्दीच्या प्रारंभी, कौशल्ये शिकताना वा विकसित करताना, आपल्याला आपला अहंकारच प्रतिबंधित करीत असतो. जेव्हा आपण यशाची चव घेतो, तेव्हा अहंकार आपल्या स्वतःच्या चुकांकडे डोळेझाक करायला लागतो. अहंकार आपल्याला इतरांपासून सहजपणे दूर करीत एकटे पाडतो. यातून आपण अधःपतीत होऊ लागतो. एकूणच, अहंकार विनाशकारी असल्याचे रायन आपल्या निदर्शनास आणून देतो. म्हणूनच 'मी'पणाला अहंकाराला आपण वेळीच ओळखायला हवे! तसे झाले तरच, आपण आपले कार्य पूर्ण क्षमतेने करू शकू!
      आपल्या इच्छा-आकांक्षांच्या मागे धावताना वर्तमानाचे भान आपण सोडता कामा नये! मुख्य म्हणजे, आपण नम्र राहिले पाहिजे. मोठे यशवैभव प्राप्त झाल्यानंतरदेखील आपले पाय जमिनीवर घट्ट रोवलेले हवेत! यशापेक्षा अपयशातून आपल्याला खूप काही शिकता येते. त्यासाठी आपण लवचिक आणि ग्रहणशील राहिले पाहिजे. अहंकाराला हद्दपार करीत, नम्रता आणि आत्मविश्वास या दोन गोष्टी जर तुमच्याकडे असतील, तर तुम्ही वास्तवाचा सहजपणे सन्मान करू शकाल! हा रायन हॉलिडेचा सांगावा आहे.

पुस्तक:इगो इज द् एनिमी'
लेखक:रायन हॉलिडे
मराठी अनुवाद: डॉ कमलेश सोमण आणि जीवन आनंदगावकर
प्रकाशन: गोयल प्रकाशन
पृष्ठ:२७२
मूल्य:२५०/ टपाल:३०/ एकूण:२८०/
खरेदीसाठी व्हॉट्सॲप करून नाव, पत्ता, पिनकोड आणि मोबाईल नंबर
 9421605019

02 December 2021

मन वढाय वढाय, उभ्या पीकातलं ढोर

 कोना कोणाला शाळेत हि कविता शिकवत असताना झालेल्या गमती आटवतात 


मन वढाय वढाय, उभ्या पीकातलं ढोर । किती हाकला हाकला, फिरी येतं पिकांवर ।।
मन मोकाट मोकाट, त्याले ठायी ठायी वाटा । जशा वार्‍यानं चालल्या, पानावर्हल्यारे लाटा ।।
मन लहरी लहरी, त्याले हाती धरे कोन? । उंडारलं उंडारलं जसं वारा वाहादन ।।
मन जह्यरी जह्यरी, याचं न्यारं रे तंतर आरे । इचू साप बरा, त्याले उतारे मंतर ।।
मन पाखरू पाखरू, त्याची काय सांगू मात?। आता व्हतं भुईवर, गेलं गेलं आभायात ।।
मन चप्पय चप्पय, त्याले नही जरा धीर । तठे व्हयीसनी ईज, आलं आलं धर्तीवर ।।
मन एवढं एवढं, जसा खाकसचा दाना । मन केवढं केवढं? आभायात बी मायेना ॥
देवा, कसं देलं मन आसं नही दुनियात । आसा कसा रे तू योगी काय तुझी करामत ॥
देवा, आसं कसं मन? आसं कसं रे घडलं । कुठे जागेपनी तूले असं सपनं पडलं ॥

कवयित्री – बहिणाबाई चौधरी




विशाखा

म ध्यंतरी मराठी पाठ्यपुस्तकातील कवितेवरून समाज माध्यमांवर मोठा वादंग सुरू होता. त्यात एक बाब ठळकपणे अधोरेखित झाली, ती म्हणजे आजच्या तरुण पिढ...